गाव पातळीवर आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष बळकटीसाठी आपण सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करूया - नितीन दादा शेंडे.
बारामती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यक्षम अध्यक्ष श्री जयंतराव पाटील साहेब यांनी गाव पातळीवर बूथ पातळीपासून संघटना मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना आपापल्या गावांमध्ये एकत्र बसून समस्यांबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठका लावण्याच्या सूचना केल्या त्या प्रमाणे आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात या बैठका होत आहेत.
बारामती तालुक्यातील मळद गावामध्ये श्री वाघेश्वर मंदिर येथे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी या बैठकीच्या नियोजनाचे प्रास्ताविक करताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे म्हणाले गाव पातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब, आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांना गावपातळीवर जास्तीत जास्त ताकद देण्यासाठी सर्व कार्यकर्ते आपापसातील मतभेद बाजूला ठेवून काम करतील आणि एक दिलाने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी योगदान देतील.
याप्रसंगी सर्वांचे स्वागत विद्यमान सरपंच योगेश बनसोडे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य श्री प्रफुल्ल गावडे पाटील यांनी मानले. याप्रसंगी श्री जयप्रकाश घाडगे, श्री शहाजी काका गावडे पाटील, श्री रामचंद्र नाना मदने उपाध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, माळेगाव कारखाना संचालक सागर भोंगळे, माजी संचालक बाळासाहेब गवारे, युवा कार्यकर्ते राजकुमार पोतेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद लोंढे, श्री तुकाराम गावडे पाटील, श्री लाला साहेब गावडे पाटील, श्री. वसंतराव गदादे गुरुजी, नाना गावडे पाटील, श्री.युवराज नाना शेंडे, श्री त्रिंबकराव सातव, श्री. विशाल गायकवाड, नाना जाधव, राहुल आटोळे, कल्याण मोहिते, दगडू लोंढे, श्री. राजेंद्र मदने इत्यादी कार्यकर्त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि काही सूचना केल्या.
ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. या बैठकीत विजेचे प्रश्न कारखाना ऊस तोडी चे प्रश्न आणि गावातील विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.