जेंव्हा अशोक सराफ , रंजना यांना हॉस्पिटलमध्ये भेटू दिलं जात नव्हतं...

"अशोक सराफ रोज हॉस्पिटलमध्ये रंजनाला भेटायला यायचे पण भेटू दिलं जात नव्हतं".... बऱ्याचदा अभिनेत्री रंजना देशमुखचा विषय निघाला की लोकं अशोक सराफ यांना ट्रोल करतात. तिच्या शेवटच्या दिवसांत अशोक सराफ यांनी साथ दिली नाही म्हणून नावं ठेवतात. पण असाच एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशोक सराफ यांची ही बाजूही माहीत व्हावी हाच यातून एक प्रयत्न....
"नाही सोडली त्यांनी साथ....
ज्या हॉस्पिटल मध्ये रंजना होत्या तिथेच माझी काकू पण ऍडमिट होती शेजारच्या रूम मध्ये.. मणक्याच्या आजाराने सहा महिने काकू तिथे ऍडमिट होती तेव्हा खूप जवळून तिने सगळं पाहिलं होतं.. आजही ती ते सगळं सांगते आम्हांला.. अशोक सराफ यांना रंजना ला भेटू दिलं जायचं नाही संध्या बाई आणि रंजनाची आई तिथेच असायच्या सतत अशोक सराफ यांचा पाणउतारा करायच्या.. काकू सगळं ऐकायची.. तरीही अशोक सराफ जायचे नाहीत बाहेरच्या कोरिडोर मध्ये दिवसभर नुसते बसून असायचे.. कोरिडोर मध्ये तमाशा करायच्या संध्याबाई.. पण हा माणूस खाली मान घालून मुकाट ऐकायचा.. असं कित्येक दिवस सुरु होतं.. काकूला संध्याकाळी चालायला बाहेर आणलं कि काकू अशोक सराफांना का तुम्ही इतकं ऐकून घेता? असं विचारायची.. आणि तो दिग्गज माणूस हसून उत्तर टाळायचा.. रंजना डिस्चार्ज होईपर्यत अशोक सराफ तिथे रोज अपमान सहन करत दिवसभर बसून असायचे.. ह्या घटनेचे साक्षीदार माझे काका काकू आहेत.. आजही रंजना वरून कुणी अशोक सराफांना टार्गेट केलेलं तिला सहन होत नाही.. तिचं म्हणणं ह्या नाण्याची दुसरी बाजू तिने स्वतः बघितलीय..
असो..धन्यवाद ????"...
मूळ लेख -अरुण नाडकर्णी