महाराष्ट्र सोशल मिडीयाच्या कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट राहुल निकाळजे यांची निवड
नव्या जबाबदारीसह ॲड. निकाळजे यांचे पाऊल सोशल मीडिया क्षेत्रात.

कायदेशीर सल्ल्यामुळे संस्थेचे कार्य होणार अधिक परिणामकारक असून सोशल मीडिया व सायबर कायद्यांशी संबंधित प्रश्न सोडवणे आणि डिजिटल हक्कांचे संरक्षण यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बारामती: महाराष्ट्र सोशल मिडीया च्या कायदेशीर सल्लागारपदी ॲडव्होकेट राहुल निकाळजे यांची निवड झाली आहे. सोशल मीडिया व सायबर कायद्यांबाबत संस्थेला आवश्यक मार्गदर्शन मिळावे, तसेच डिजिटल हक्क संरक्षणासाठी सक्षम धोरणे राबवता यावीत या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या कार्याला कायदेशीर बळकटी मिळावी, तसेच सोशल मीडिया क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाताना योग्य तो कायदेशीर सल्ला उपलब्ध व्हावा, यासाठी ॲड. निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग संस्थेच्या भविष्यातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष सतीश(भाऊ) साबळे, प्र. अध्यक्ष शिरीष कादबाने, कार्याध्यक्ष रमेश(तात्या) पाटील, राज्य प्रवक्ता सुनील(भाऊ) ठाकरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रभाकर पांडे, मुंबई अध्यक्ष गणेश मुळे-पाटील व राज्य कार्यकारिणी सदस्य हेमा बा. यांनी ॲड. राहुल निकाळजे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.