महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र सोशल मिडीया च्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी विजय चव्हाण (सर) यांची निवड.

महाराष्ट्र सोशल मिडीया च्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी विजय चव्हाण (सर) यांची निवड.
November 28, 2025 12:08 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया : विजय चव्हाण(सर) यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे कि, आपले इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्य बघता तसेच आपले समाजातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांची सुख-दुखें व त्यांच्या अडी-अडचणी व प्रश्न सोडविण्याची आपली जिज्ञासा पाहून महाराष्ट्र सोशल मिडियाच्या “ इंदापूर तालुका अध्यक्ष ” सोशल मिडिया डिजिटल पत्रकार पदी नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र सोशल मिडिया समाजातील सर्व घटकांवर होणारे अन्याय,अत्याचार तसेच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम करते. तरी आपण प्रामाणिक व निष्ठावंत लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. आपण महाराष्ट्र सोशल मिडीयाचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो. तसेच पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा!


या निवडीबद्दल महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश{भाऊ}साबळे , कार्याध्यक्ष रमेश(तात्या)पाटील,संघटक आण्णासाहेब साळुंखे,राज्य कार्यकारणी सदस्य राकेश कपूर तसेच महिला जिल्हा अध्यक्ष मीनाक्षी भिसे ,तालुकाध्यक्ष शीतलताई साबळे व महाराष्ट्र सोशल मीडियाचे लीगल ॲडव्हायझर एडवोकेट राहुल जी निकाळजे

यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत





संबधित बातम्या