सोशल मीडियाचा विधायक वापर कसा करावा? प्रा. सुनील ठाकरे (प्रवक्ते महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य) सरांचा आदर्श उपक्रम चर्चेत
यवतमाळ, पुसद चे सुनील ठाकरे राज्य प्रवर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर विविध उपक्रम.
मुंबई/विशेष प्रतिनिधी:
सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी वापर न करता, त्याचा उपयोग सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व लोकांच्या अडीअडचणींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण प्रा. श्री. सुनील ठाकरे यांनी घालून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून कौतुक होत आहे.
प्रा. सुनील ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व मित्रपरिवाराचे वाढदिवस, तसेच थोर महापुरुष व समाजसेवकांची जयंती आणि पुण्यतिथी न चुकता अत्यंत आपुलकीने साजरी करतात. यासोबतच, सर्वसामान्यांच्या समस्या व अडीअडचणी सोशल मीडियावर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत आहेत.
त्यांच्या या हसतमुख, मनमिळावू आणि निःस्वार्थी सामाजिक कार्यामुळे सोशल मीडियावर एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढीनेही सोशल मीडियाचा असाच विधायक आणि समाजोपयोगी कामांसाठी वापर करावा, असा संदेश यातून मिळत
आहे.
