अश्या मुलींना जर आईची वेदना कळत नसेल तर आपल्यासाठी मेली म्हणून समजायच...तिने सगळ्यांसमोर जन्मदिलेल्या आईची मान खाली पाडली ... सतिश(भाऊ)साबळे
लहानपणीची , घरच्या गोठ्यातल वासरू दगवल्यावर किंवा विकल गेल्यावर गायीची होणारी घालमेल आठवली
महाराष्ट्र सोशल मिडिया आज कोर्टाच्या आवारात जिवाच्या आकांताने रडणारी आई पाहून काळजात वेदना उठल्या , , नवऱ्या शिवाय भारतीय समाजजीवनात एखादी स्त्री आपल्या लहान मुलांना घेऊन जगताना तिच्या वाट्याला कोणत्या पातळीवर संघर्ष येतो याची कल्पना सर्वानाच असते , , लहानपणीची , घरच्या गोठ्यातल वासरू दगवल्यावर किंवा विकल गेल्यावर गायीची होणारी घालमेल आठवली , , कायदा काय म्हणतो , व्यक्ती स्वतंत्र , संविधानिक हक्क , ठराविक वया नंतर माणस मोठी होतात आणि स्वतःला योग्य ते निर्णय घेऊ शकतात वैगेरे एका बाजूला आहेत , आणि आयुष्याचे खरे प्रश्न नात्यामधील ओलावा , बंधन , आणि सामाजिक प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला आहेत , आपल्या सामाजिक जीवनाचा ब्यालन्स टिकून रहावा म्हणून काही नियम बनवले गेले काळाच्या ओघात टप्प्या टप्प्यावर त्यात बदल होत गेलेत पण , , मुलांनी आईबापाला एका रात्रीत सोडून द्याव , एका क्षणात त्यांना आईबापा पासून जीवाला धोका आहे म्हणून त्यांच्यावर आरोप करून आईबापला स्वतःच्या असण्याची लाज निर्माण करून द्यावी हे खूपच अमानवी आहे ,
कुणी कुणाबरोबर लग्न करावं यावर कसलं ही कायदेशीर बंधन आपल्याकडे नाही , , , नसावं ही , पण आई बापाच्या संमती शिवाय त्यांना काडीची किंमत न देता एखाद्या माणसा बरोबर निघून जावं हे ही खूप क्लिष्ट आणि एकेरी गोष्ट आहे , ज्यांच्या घरातील मुली निघून जातात ती कुटुंब हळूहळू आतल्याआत मरताना पहिलीत मी , , स्वतःच्या आई बाप , भाऊ आणि इतर कुटुंबाला मूल सोडून देतात आणि मग अशी माणसं ही स्वतःच स्वतःला दोष देत आयुष्य काढत राहतात , खरतर कोणी ही त्यांना स्पष्ट काही म्हणत नाही पण या माणसांचा समाज जीवनाचा धागा उसवला जातो त्यांना पुन्हा कधीच खर खर खळखळून हसायला येत नाही , कुणाच्या लग्नात नाचता येत नाही , कुणाच्या खांद्यावर बसून शड्डू ठोकता येत नाही की , पुढं होऊन कुणाचं लग्न जमवता येत नाही , मनासारखं जगता येत नाही , एका मागे एक मानसिक दुःखाच्या लाटा येत राहतात आयुष्यभर , ,
आपण लक्षात घेतलं पाहिजे , धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे , जातीअंताची चळवळ , किंवा सामाजिक सुधारणा वैगेरे दुःख पेरण्यासाठी नसतात , त्या दुःख वेचण्यासाठी असतात , भिगवण प्रकरणात या पोरींने उचललेले पाऊल मला व्यक्तीशः मनापासून आवडलेले नाही आपल्या आईचा हंबरडा तिला ऐकू येत नसेल तर किती भावनाशून्य झालो आहोत आपण याचा विचार केला पाहिजे ,
