महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

करमाळा तालुका पंचायत समिती केतूर गणातून शिवसेनेच्या वतीने संतोषजी वारगड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा तालुका पंचायत समिती केतूर गणातून शिवसेनेच्या वतीने संतोषजी वारगड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
January 20, 2026 02:58 PM ago Karmala, Maharashtra, India

करमाळा पंचायत समिती केतूर गणातून शिवसेना (धनुष्यबाण) पक्षाचे संतोषजी वारगड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून ५ फेब्रुवारीला धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

करमाळा तालुका पंचायत समितीच्या केतूर गणातून शिवसेना (धनुष्यबाण) पक्षाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा संघटक व महाराष्ट्र सोशल मीडियाचे मुख्य प्रवक्ते संतोषजी वारगड यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर गोयेगाव, केतूर, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, गुलमरवाडी, जिंती, रामवाडी, कात्रज, को. चिंचोली, टाकळी, खादगाव, पोमलवाडी आदी परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

या वेळी प्रतिक्रिया देताना संतोषजी वारगड म्हणाले की, “मिळालेला जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे.” त्यांनी सर्व मतदारांना ५ फेब्रुवारी रोजी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र सोशल मीडियाचे अध्यक्ष अभिनंदन सतीश साबळे तसेच शिरीष कादबाने (प्रभारी अध्यक्ष) यांनी संतोषजी वारगड यांचे उमेदवारीबद्दल अभिनंदन करत, केतूर गणात शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.


संबधित बातम्या