महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र सोशल मीडियाचा भव्य मेळावा; अण्णासाहेब साळुंखे यांची माहिती

अण्णासाहेब साळुंखे यांनी सर्व संबंधितांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र सोशल मीडियाचा भव्य मेळावा; अण्णासाहेब साळुंखे यांची माहिती
3 m 11 hrs 20 min 35 sec ago Baramati, Maharashtra, India

सोलापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र सोशल मीडियाचा सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भव्य सोशल मीडिया मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी अण्णासाहेब साळुंखे यांनी दिली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या कामाला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात सोशल मीडिया वापरातील नवे ट्रेंड, जबाबदारीची जाणीव, तसेच डिजिटल पत्रकारितेतील संधी आणि आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हाभरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अण्णासाहेब साळुंखे यांनी सर्व संबंधितांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील सोशल मीडिया क्षेत्रासाठी नवे पर्व ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळाव्याची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

संबधित बातम्या