सोलापूर जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी युवक-युवतींना मोठ्या उपस्थितीचे आवाहन. धनाजी पिसे
सोलापूर जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी माळशिरस तालुक्यातील युवक-युवतींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सोशल मीडिया माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पिसे यांनी केले आहे.
माळशिरस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी माळशिरस तालुक्यातील युवक-युवतींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सोशल मीडिया माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पिसे यांनी केले आहे.
या जिल्हास्तरीय मेळाव्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकारण, डिजिटल जनजागृती, तसेच युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची व समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची मोठी संधी मिळणार असल्याचेही पिसे यांनी सांगितले.
धनाजी पिसे पुढे म्हणाले की, माळशिरस तालुका नेहमीच सामाजिक आणि डिजिटल चळवळींमध्ये सक्रिय राहिला आहे. त्यामुळे या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून तालुक्याचा ठसा उमटवावा.
या मेळाव्याची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असून, सर्व युवक-युवतींनी तयारीत राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
