फक्त महाराष्ट्र नव्हे; दक्षिणेच्या राज्यांतही ‘महाराष्ट्र सोशल मीडिया’चा डंका!
डिजिटल मीडियाच्या युगात जिथे मुख्य प्रवाहातील माध्यमे अनेकदा अपयशी ठरताना दिसतात, तिथे 'महाराष्ट्र सोशल मीडिया डिजिटल न्यूज'ने थेट राज्याची सीमा ओलांडून शेजारील राज्यांमध्येही आपला भगवा आणि करारी बाणा रोवला आहे.
विशेष प्रतिनिधी | मुंबई
डिजिटल मीडियाच्या युगात जिथे मुख्य प्रवाहातील माध्यमे अनेकदा अपयशी ठरताना दिसतात, तिथे 'महाराष्ट्र सोशल मीडिया डिजिटल न्यूज'ने थेट राज्याची सीमा ओलांडून शेजारील राज्यांमध्येही आपला भगवा आणि करारी बाणा रोवला आहे.केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे, तर थेट कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्येही या संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वतःचा दणदणीत दबदबा निर्माण केला आहे.
कर्नाटक, बेळगाव, बंगळुरू ते तामिळनाडूपर्यंत डिजिटल प्रतिनिधींचे मजबूत जाळे; ‘आवाज जनतेचा… विश्वास महाराष्ट्राचा!’
डिजिटल माध्यमांच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात मुख्य प्रवाहातील माध्यमांना नवी दिशा देत ‘महाराष्ट्र सोशल मीडिया’ ने आपल्या डिजिटल पत्रकारितेचा झेंडा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट दक्षिण भारतात रोवला आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये मराठी माणूस, मराठी भाषा आणि जनतेच्या प्रश्नांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र सोशल मीडियाचे डिजिटल प्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.
राजकारण असो, समाजकारण असो किंवा प्रशासनातील जनतेशी संबंधित प्रश्न—घटना घडते तिथे पोहोचून सत्य जनतेसमोर मांडण्याचा निर्धार या माध्यमाने केला आहे. दिल्ली-मुंबईच्या राजकारणापासून ते ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक विषयाला डिजिटल व्यासपीठ देण्याचे काम सुरू आहे.
सीमा नाही अडवत आमचा वेग; सत्याचा झेंडा, हाच आमचा ध्येय!
महाराष्ट्र सोशल मीडियाने उभारलेले डिजिटल प्रतिनिधींचे नेटवर्क आता गावापासून शहरापर्यंत आणि महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत विस्तारत आहे. कर्नाटकातील बेळगाव, बंगळुरू तसेच तामिळनाडूमधील विविध भागांमध्ये मराठी बांधवांच्या प्रश्नांना आणि स्थानिक घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रतिनिधी सज्ज होत आहेत.
“जिथे मराठी माणूस, जिथे शोषितांचा आवाज… तिथे महाराष्ट्र सोशल मीडियाचा प्रतिनिधी हजर!”
हा केवळ नारा नसून जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलेल्या डिजिटल पत्रकारितेचा नवा संकल्प असल्याचे चित्र दिसत आहे.
जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी डिजिटल क्रांती!
अपघात असो किंवा अन्याय, राजकारण असो किंवा प्रशासनातील गैरप्रकार—घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळेच अल्पावधीत डिजिटल क्षेत्रात या माध्यमाने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचा दावा पोस्टरमधून करण्यात आला आहे.
एकजूट हीच ताकद!
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांना एकत्र आणत एक मजबूत डिजिटल न्यूज नेटवर्क उभे करण्याचा संकल्प महाराष्ट्र सोशल मीडियाने केला आहे. निष्पक्ष, निर्भीड आणि जनहितासाठी तत्पर पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रशासन आणि सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सतीश (भाऊ) साबळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या डिजिटल चळवळीचा विस्तार भविष्यात देशभर होणार का? याकडे आता महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील मराठी समाजाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सोशल मीडिया – आवाज जनतेचा… विश्वास महाराष्ट्राचा!
जमिनीवरची बातमी… जनतेचा विश्वास!
