महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

करमाळा तालुक्यातील युवक-युवतींना जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी उपस्थितीचे आवाहन. महादेव गायकवाड

महादेव गायकवाड (अध्यक्ष-करमाळा तालुका)पुढे म्हणाले की, करमाळा तालुका हा नेहमीच सामाजिक आणि डिजिटल उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिला आहे.
करमाळा तालुक्यातील युवक-युवतींना जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी उपस्थितीचे आवाहन. महादेव गायकवाड
May 01, 2026 08:16 PM ago Baramati, Maharashtra, India

करमाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सोशल मीडिया सोलापूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातील युवक-युवतींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सोशल मीडिया करमाळा तालुका अध्यक्ष महादेव गायकवाड यांनी केले आहे.


या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना डिजिटल क्षेत्रातील संधी, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची प्रेरणा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


महादेव गायकवाड पुढे म्हणाले की, करमाळा तालुका हा नेहमीच सामाजिक आणि डिजिटल उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मेळाव्यात तालुक्यातील युवक-युवतींनी सक्रिय सहभाग नोंदवून करमाळ्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवावा.


या कार्यक्रमाची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असून, सर्वांनी तयारीत राहावे, असेही त्यांनी सांगितले.

संबधित बातम्या