कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या राकारणाची सुरुवात अंथुर्णे गावातून; तरीही विकासप्रश्न कायम, पाणीटंचाई गंभीर . सतिश(भाऊ)साबळे
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अंथुर्णे गावातून झाली. मात्र, ज्या गावातून नेतृत्वाला बळ मिळाले, त्या अंथरुणे गावात आजही अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र सोशल मीडिया: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अंथरुणे गावातून झाली. मात्र, ज्या गावातून नेतृत्वाला बळ मिळाले, त्या अंथरुणे गावात आजही अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गावातील अनेक विकास योजना केवळ कागदावरच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. निवडणुका जवळ आल्या की विविध योजना, आश्वासने आणि विकासकामांच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात कामे संथ गतीने किंवा अपूर्ण अवस्थेत राहतात, अशी नाराजी ग्रामस्थांमध्ये आहे.
यामध्ये सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आहे. उन्हाळा सुरू होताच गावात पाणीटंचाई तीव्र होते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गाला पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
गावातील विहिरी, बोअरवेल आणि पाणीपुरवठा योजना अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिकांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, नवीन विहिरी खोदाव्यात आणि कायमस्वरूपी योजना राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. विशेषतः पाणीपुरवठा योजना, नवीन जलस्रोत, टँकर व्यवस्था आणि रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावातून राजकारणाला सुरुवात झाली, तर आता गावाच्या विकासालाही गती मिळावी, अशी भावना अंथरुणेकर व्यक्त करत आहेत.
