महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

“कृषी मंत्र्यांच्या गावाची दयनीय अवस्था; ज्यांनी उभं केलं, त्यांनाच विसरलं?”

ज्या गावाने नेता घडवला, त्या गावाचा विकास करणं हीच खरी परतफेड नाही का?
“कृषी मंत्र्यांच्या गावाची दयनीय अवस्था; ज्यांनी उभं केलं, त्यांनाच विसरलं?”
9 hrs 57 min 55 sec ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मीडिया ;- राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना, घोषणा आणि भाषणांचा गाजावाजा होत असताना, एक कटू वास्तव समोर येत आहे — स्वतः कृषी मंत्र्यांच्या गावातच विकासाचा मागमूस नाही!


ज्या मातीतून राजकारणाची सुरुवात झाली…

ज्या गावाने पाठिंबा देऊन नेतृत्व घडवलं…

आज त्याच गावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.


गावातील कोणताही पुढारी मोठा होऊ दिला नाही जो तो स्वतःच्या मार्गाने मोठा होत आहे कोणत्याही पुढार्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला उभा राहू देत नाहीत किंवा दिले नाही..

तरीही काही पुढारी चॅप्लिशी करताना पुढे पुढे करत असतात आणि काहीजण चमचेगिरी करण्यात स्वतःला मोठे समजत आहेत..

गावातील युवक वर्ग यांच्याकडे कोणतेही प्रकारचे काम नाही . काम नसल्यामुळे त्यांचे लग्नही जुळत नाहीत . यामुळे युवक वर्ग व्यसनाधीन होऊ लागला आहे .

गावातील युवक वर्ग यांच्याकडे कोणतेही प्रकारचे काम नाही . काम नसल्यामुळे त्यांचे लग्नही जुळत नाहीत . यामुळे युवक वर्ग व्यसनाधीन होऊ लागला आहे .

कृषिमंत्री साहेब आपण कृषिमंत्री आहात आपल्या हातात भरपूर गोष्टी आहेत.. पण तरी तुम्ही दुर्लक्ष करीत आहात..

सत्ता येते सत्ता जाते.. सत्ता कायम राहत नाही..

योजना कागदावरच, गाव मात्र अंधारात


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,


शासकीय योजना फक्त कागदावरच दिसतात


पाणी, रस्ते, शेतीसाठी सुविधा अपुऱ्या


रोजगाराच्या संधी नाहीत


प्रशासनाकडून दुर्लक्ष


गावात विकासाची केवळ आश्वासनं आहेत… प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे!


नेतृत्वाचा अभाव की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?


गावात कोणताही प्रभावी पुढारी दिसत नाही.

प्रश्न विचारायला कोणी नाही… आणि उत्तर द्यायला तयारही कोणी नाही!


ग्रामस्थांचा संतप्त सवाल —

“ज्या गावामुळे तुम्ही कृषी मंत्री झाला, त्या गावाकडेच पाठ का फिरवली?”


भावनिक प्रश्न, कठोर वास्तव


आज गावातील शेतकरी, युवक आणि सामान्य नागरिक विचारत आहेत —


आमच्यासाठी योजना कुठे आहेत?


आमच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार?


विकास फक्त भाषणातच का दिसतो?


आता तरी जाग येणार का?


गावातील लोकांच्या सहनशीलतेची मर्यादा संपत चालली आहे.

आश्वासनांपेक्षा आता कृती हवी आहे.


ज्या गावाने नेता घडवला, त्या गावाचा विकास करणं हीच खरी परतफेड नाही का?



महाराष्ट्र सोशल मीडिया

संबधित बातम्या