महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

17 बंद साखर कारखान्यांना नवसंजीवनी; बोत्रे पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे हजारो कुटुंबांना आधार . संतोष वारकड.

सध्या एका महिन्याचे ऊस बिल प्रलंबित असल्याच्या कारणावरून काहीजणांकडून टीका केली जात आहे.
17 बंद साखर कारखान्यांना नवसंजीवनी; बोत्रे पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे हजारो कुटुंबांना आधार . संतोष वारकड.
May 03, 2026 08:11 PM ago Baramati, Maharashtra, India

करमाळा : महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने गेली पाच ते दहा वर्षे बंद अवस्थेत पडून होते. या बंद कारखान्यांमुळे शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेक कारखाने राजकीय घराण्यांच्या ताब्यात असूनही त्यांना सुरू करण्यासाठी कोणी ठोस पावले उचलली नव्हती.


अशा परिस्थितीत बोत्रे पाटील यांनी मोठी आर्थिक जोखीम स्वीकारत मागील तीन वर्षांत तब्बल 17 बंद साखर कारखाने पुन्हा सुरू केले. या कारखान्यांमधून आजअखेर 55 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून हजारो कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या हातालाही पुन्हा काम मिळाले आहे.


सध्या एका महिन्याचे ऊस बिल प्रलंबित असल्याच्या कारणावरून काहीजणांकडून टीका केली जात आहे. मात्र, हजारो कोटींची गुंतवणूक करून बंद कारखान्यांना नवजीवन देणाऱ्या नेतृत्वावर शंका घेणे योग्य नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.


शेतकऱ्यांचे बिल देणे ही निश्चितच प्राथमिकता आहे; परंतु या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याची गरज आहे. पूर्वी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच पडून राहत होता, अनेकांना दोन-दोन वर्षे पैसे मिळत नव्हते. त्या वेळी आवाज उठवणारे आज अचानक सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश पसरवत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


बोत्रे पाटील यांनी केवळ कारखाने सुरू केले नाहीत, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला नवी दिशा दिली आहे.


— संतोष वारगड

प्रवक्ते, महाराष्ट्र सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य

संबधित बातम्या