महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही ? सतीश(भाऊ)साबळे

सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही ?
सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही ? सतीश(भाऊ)साबळे
November 18, 2025 03:47 PM ago Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मीडिया ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसा जसा जवळ येत आहेत तसा तसा पैसाविरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . गाव पातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संकटाच्या काळात धावून जाणारे समाजासाठी झटणारे कार्यकर्ते निवडणुकांच्या वेळी मात्र मागे पडतात तर पैशाची ताकद गटबाजी आणि पैशाच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे पैसे असेल तर तरच निवडणूक लढवावी का अनेक ठिकाणी निवडणुकीचा स्वरूप खर्चिक होत चालला आहे प्रचारासाठी गाड्या , पोस्टर बॅनर , जेवणावंळी माणसे फिरवणे यासाठी लाखोंचा खर्च असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात हेच कार्यकर्ते वर्षानुवर्ष सामाजिक कामात गुंतलेले असतात लोकांच्या अडीअडचणीत हजर असतात पण मतदानांच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एवढेच सांगतात मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच देतात त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांचा विजय होतो लोकशाहीत मतदार राजा असतो पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर लाभावर आधारित मतदान केले तर विकासाच्या प्रश्नावर त्याचे दुर्गामे परिणाम होतात निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात हे कटू सत्य व वस्तुस्थिती आहे समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे .

निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात पण तिकीट मागू नये का?

अनेक कार्यकर्ते आपल्या गावात मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी आर्थिक ताकद वरच्या स्तरावरील शिफारशी राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते .

बंद होतात ,परिणामी जमिनीवर खऱ्या अर्थाने पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात त्यांना "तू तर आपला आहेस* या एका वाक्यात शांत केले जाते हे कार्यकर्ते वर्षानुवर्षी नेतृत्वाची धुरा सांभाळतात, सभा सजवतात , पोस्टर लावतात, बॅनर वाहतात, जनतेत प्रचार करतात पण निर्णय क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात .

संबधित बातम्या