महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बीड जिल्ह्यातील शिरूर-गेवराई तालुक्यांना जलसंपन्नतेची भेट.. सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश

बीड जिल्ह्यातील शिरूर-गेवराई तालुक्यांना जलसंपन्नतेची भेट..      सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश
August 26, 2025 08:00 PM ago Baramati, Maharashtra, India

मुंबई, दि. 26:- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत असून हा निर्णय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.


बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांना बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयामुळे शिरूर कासार व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बॅरेज झाल्यानंतर या भागातील पाणीसाठ्यात वाढ होऊन परिसरातील विहिरी, बोरवेलांची पाणी पातळी तसेच भूजलस्तर उंचावणार, परिणामी खरीप-रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.


शेतकरी व नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

*****

संबधित बातम्या