महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

देऊळ बंद च्या पहिल्या भागाच्या यशानंतर.. देऊळ बंद २ . सतिश(भाऊ)साबळे

देऊळ बंद २ हा सिनेमा तरडेंच्याच भाषेत “खतरनाक” तर नाही म्हणता येणार पण पाहिल्यानंतर “आरा रा रा रा” झालाय असे मला वाटले !
देऊळ बंद च्या पहिल्या भागाच्या यशानंतर.. देऊळ बंद २ . सतिश(भाऊ)साबळे
12 hrs 51 min 55 sec ago Baramati, Maharashtra, India

देऊळ बंद २ !

देऊळ बंद च्या पहिल्या भागाच्या यशानंतर आणि मागील ११ वर्षातील इतर चित्रपटांच्या यशाच्या पुण्याई नंतर श्री प्रवीण तरडे पुन्हा एकदा देऊळ बंद २ एक नवीन विषयासोबत प्रचंड मार्केटिंग करून पब्लिसिटी करून, सिनेमा डिस्ट्रीब्यूशन च्या नाही नाही त्या शकला लढवून २१ मे रोजी घेऊन आले ! सिनेमा रिलीज़ झाल्यानंतर पण इंस्टाग्राम वर तरडे सरांचा रोज एक वीडियो येत असतो, त्यांच्या चित्रपटाच्या टेम्पलेट सारखाच - कार मध्ये बसून त्यांची दिवसभराची दौऱ्याची दिनचर्या सांगायचा, ते पण मध्ये मध्ये त्यांच्या अप्पर लिप्स ला मिश्यांच्या जाळ्यातून थोडे वारे द्यायचा प्रयत्न करत !


असो, सिनेमा रिलीज़ झाल्यानंतर पहिल्या एक दोन दिवसात च तो रील्स मध्ये अर्धा अधिक दिसला असून ही मी तिसऱ्या दिवशी हा सिनेमा पाहिला ! सिनेमाचे जिकडे तिकडे वारेमाप कौतुक होते आहे हे पाहून आनंद वाटतोच आहे, पण एवढे कौतुक का? हा प्रश्न पण पडतोय म्हणून हे लिहिण्याचं धारिष्ट्य करतोय.


देऊळ बंद २ हा सिनेमा तरडेंच्याच भाषेत “खतरनाक” तर नाही म्हणता येणार पण पाहिल्यानंतर “आरा रा रा रा” झालाय असे मला वाटले !

सिनेमाचा विषय हा ज्वलंत तर आहेच पण तो यूनिवर्सल पण आहे ते म्हणजे - शेतकऱ्यांची आत्महत्या ! याची टॅग लाइन पण इंटरेस्टिंग च होती - आता परीक्षा देवाची. पण हा विषय दाखवण्याच्या नादात सिनेमा प्रचंड प्रमाणात भरकटला आहे असंच सारखं वाटत राहते. एकतर तीन तासांची एवढी मोठी लेंथ करण्याएवढा जीव च या कथेत आणि पटकथेत नव्हता अस पाहत असतांना सतत वाटत. सिनेमाची सुरुवात छान असली तरी पुढच्या अर्ध्या तासात सिनेमा रटाळ वाटायला सुरुवात होते. प्रसाद ओक च्या पहिल्याच बस च्या प्रसंगात मागे ढळढळीत क्रोमा वापरण्यात आलेला आहे हे ठळकपणे दिसून येते. या सिनेमाचे लोकेशन्स पण मला फार रुचले नाहीत, आणि त्यामुळेच त्याची सिनेमॅटोग्राफी पण फार विस्कळीत वाटत राहते. घेतलेला प्रत्येक शॉट हा एडिट टेबल वर वापरलाच गेला पाहिजे या अट्टहासपायी सिनेमाचे संकलन अगदीच शॉर्टफिल्म बेसिक संकलन वाटायला लागते. मध्येच क्लोज़, मधेच विचित्र वाइड एंगल, मध्येच मिड. एक्सिस चा आणि कंटिन्युटी चा अजिबात च विचार न करता एडिट झालाय इथपर्यंत त्याचे जम्प कट्स आहेत.


आश्चर्य याचं आहे की तरडेंचेच या आधीचे सिनेमे - मुळशी पॅटर्न, हंबीरराव आणि धर्मवीर हे टेक्निकली खूपच उजवे होते. पहिला देऊळ बंद चा भाग पण लोकेशन्स आणि पटकथेच्या दृष्टीने उजवा होता. मग इथेच अस का हा मोठा प्रश्न पडला !


आता बोलूया सिनेमाच्या सगळ्यात भयानक बाबीकडे- तो म्हणजे सिनेमातील अभिनय ! बापरे बाप ! मोहन जोशी आणि संस्कृती बालगुडे वगळता या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत केवळ आणि केवळ धन्यता आहे ! स्नेहल तरडे यांचा अभिनय तर केवळ चिडचिड, ओरडणे आणि नको तिथे विचित्र हावभाव देणे एवढाच दिसून येतो आणि हेच आपल्याला ३ तास सहन करावं लागत. स्वामींच्या पहिल्या आरतीच्या वेळेस तर त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवण्याचा जो काही पुरूषोत्तम करंडक अभिनय केलेला आहे, तो करत असतांना पण त्यांना कळाल नाही का की हे खूप वाईट तर होतच आहे पण दिसते पण आहे याच मला आश्चर्य वाटल. एका क्षणी त्यांचं सतत ओरडणे, माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली हा १७ वेळेला घेतलेला संवाद म्हणणे आणि चिडचिड करणे यापलीकडे त्या शेवटपर्यंत गेलेल्या नाही. शेवटी पण त्यांना होणारे रिअलायझेशन ही पण एक चिडचिड च आहे असंच वाटत.


कॅमिओ मध्ये आलेले कलाकार म्हणजे प्रसाद ओक, ॐ भूतकर आणि महेश मांजरेकर हे त्यांच्या बाजूने चोख आहेत. मंगेश देसाई, सुनील अभ्यंकर सारख्या चांगल्या कलाकारांना अक्षरशः वाया घालवलं आहे ! तरडे २०२५ च्या अहिल्यानगर करंडक स्पर्धेत परीक्षक होते, तिथून त्यांनी एकांकिका पाहून काही नवीन चेहऱ्यावर संधी दिल्याचे खूप कौतुक झाले होते, पण वास्तविक वांबुरकर सोडून बाकी सगळ्यांना मॉब मध्ये एक पण संवाद नाहीये. अजून एक गोष्ट मला बिलकुल च झेपली नाही ती अशी की ज्यांनी ज्यांनी या सिनेमाला आर्थिक हातभार दिला आहे त्यांना रोल देण्याचा अट्टहास का केलेला आहे? कृषी सल्लागार म्हणून एक माणूस दाखवला आहे तो तर चक्क तोतरे बोलतो स्क्रीन वर ! कमाल आहे. स्वतः प्रवीण तरडे हे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाप्रमाणे फक्त प्रवीण तरडे च वाटतात. त्यांनी केलेले सगळेच पात्र हुबेहूब त्यांच्यासारखेच कडे चालतात, बोलतात, मिशी ठेवतात, गॉगल घालतात हेच मला कळत नाही.


मग तो देऊळ बंद पहिला असो, मुळशी असो का हंबीरराव, सगळीकडे प्रवीण तरडे हे तसेच कसे? इथेपण काही विशेष कामगिरी त्यांच्याकडून घडलेली दिसलीच नाहीये. त्यांचे ठरलेले डावा आणि उजवा हात म्हणजे देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी यांच्याबद्दल तर न बोललेल च बराय !


मोहन जोशींनी खूप सुंदर काम केले आहे ! या वयात देखील त्यांची क्षमता, हावभाव आणि बॉडी लैंग्वेज हे प्रत्येक ठिकाणी स्वामींना न्याय देतात. सिनेमाची विषय खरेच चांगला होता. पण मला अपेक्षा खूप होती की तो छान फुलवता आला असता, पण इथे नाही त्या गोष्टींमध्येच सिनेमा खूप अडकल्यासारखा वाटला. पहिला भाग यापेक्षा खूप उजवा आणि छान होता.


स्वामींना अशा पद्धतीने आजवर कोणी दाखवलेले नाहीये, त्याबाबतीत आदर आहेच. सिनेमा चालतोय याचे कौतुक पण आहेच. फक्त जे दिग्पाल लांजेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमे बनवून माथेर केल ते देऊळ बंद च होऊ नये हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना


कदाचित वाचतांना परखड वाटू शकते,

पण जे वाटले ते लिहिले !


पूर्ण वाचले असेल तर धन्यवाद


संबधित बातम्या