महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वालचंदनगर पोलीसांची कामगिरी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस सह कामगिरी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस सह गुन्हेगरास अटक

वालचंदनगर पोलीसांची कामगिरी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस सह कामगिरी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस सह गुन्हेगरास अटक
June 06, 2023 12:17 PM ago Indapur, Maharashtra, India

वालचंदनगर : दिनांक ०३.०६.२०२३ रोजी मौजे कळंब गावचे हददीत रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके व रोहीत उर्फ बिल्ला अनिल घोडके दोघे रा.कळंब यांनी बॅनरवरील फोटो चे कारणावरून सुमित नामदेव घोडके यास पिस्टल चा धाक दाखवुन शिवीगाळ दमदाटी केली होती त्या
संदर्भात वालचंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता व गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना त्याचे ठावठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेउन गुन्हयातील आरोपी नामे सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके यास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि विकम साळुंखे, पोसई अतुल खंदारे तसेच पो हवा रविंद्र पाटमास ,पो.हवा शैलेश स्वामी, पो.हवा गुलाब पाटील ,पो हवा.दादासाहेब डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल किसन बेलदार, पो कॉ अभिजीत कळसकर असे पथक तयार करून सापळा रचुन त्यास शिताफीने व सावधपणे पकडण्यात आले, त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक पिस्टल व त्यामध्ये एक जिवंत राउंड मिळुन आल्याने ते जप्त करणेत आले आहे.

सदरची कामगिरी श्री अंकित गोयल सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अधिक्षक आनंद भोईटे सो बारामती विभाग /उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मार्गदर्शनाखाली स.पो.नि विकम साळुंखे, पोसई अतुल दारे तसेच पो जोठेश स्वामी, पो.हवा.गुलाब पाटील ,पो हवा.दादासाहेब डोईफोडे, पोलीस बेलदार, पो कॉ अभिजीत कळसकर तसेच पोलीस मित्र समीर शेख व अमीर मुलाणी यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो.हवा. रविंद्र पाटमास करीत आहेत.

संबधित बातम्या