अंथूर्णे गावात दिवसाढवळ्या घरफोडी.
प्रतिनिधी अंथूर्णे : 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते पाच दरम्यान इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे येथे घरातील लोक बाहेर गेल्याचा डाव साधत चोरट्यांनी गावातील सुधाकर(बाळू) सोनवणे यांच्या निवासस्थानी दिवसाढवळ्या केवळ काही मिनिटांत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटांच्या दरवाजे फोडून चोरट्यांनी तब्बल.
6 तोळे सोने आणि 4,21,000 रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. नागरिकांनी महत्त्वाचे दागदागिने व मोठी रक्कम घरी न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक आदींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अधिक तपास वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुगणे यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास अधिकारी -PSI विजय टेळकीकर
बिट अंमलदार -दतात्रय चांदणे,
गुलाब पाटील करत आहेत .
