महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कुली द पॉवरहाउस मॅजिक ,

कुली द पॉवरहाउस मॅजिक ,
August 27, 2025 01:07 PM ago Baramati, Maharashtra, India

कुली द पॉवरहाउस मॅजिक

गेल्या पाच दिवसांपुर्वीच कूली द पॉवरहाउस पाहिला. आणि आवडला देखील. या सिनेमाचे कदाचित मुद्दाम निगेटिव्ह रिव्हू लिहिलेत का? असं दोन क्षण वाटून गेलं. स्टोरीटेलींग वाईज अगदीच बिनसलेला सिनेमा नव्हता, काही भाग वगळता.

रजनीकांत सोडून सर्वच कलाकार भाव खाऊन गेलेत या सिनेमात. मला एकवेळ जेलरमधे रजनी सरांचा ऑरा पहायला भेटला होता इथे तो काही केल्या जाणवत नव्हता हे नक्की.

इतर कलाकारांमधे म्हणाल तर नागार्जुनाने अधोरेखित केलं कि, "डॉन" नावाचा स्टाईलीश डार्क शेड तुमच्या पात्राला लावत असालं तर तो पात्र फक्त तोच असू शकतो.

'कूली द पॉवरहाउस' हा सिनेमा रजनीकांतच्या अतुलनीय स्टारडम वर आधारित असला आणि तो लोकेश कनगराजच्या दिग्दर्शनाचा एक धमाकेदार संगम जरी असला तरी हा सिनेमा खऱ्या अर्थानं soubin shahir व Rachita ram या दोन पात्रांनी गाजवला आहे. म्हणजे त्यांनी अक्षरशः कहर केलायं अभिनयातून.

सर्वसामान्य रसिकांसाठी हा सिनेमा एक परिपूर्ण मसाला पॅकेज आहे, जो थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मारायला नक्कीच भाग पाडतो.

तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर, सिनेमाचा ओव्हरऑल शेड अप्रतिम वाटला. सिनेमॅटोग्राफी आणि ऍक्शन सीक्वेन्स (विशेषतः स्लो-मो आणि पोर्टवरील सीन) कमाल झाले आहेत. अनिरुद्धच्या बैकग्राउंड म्युझिकने प्रत्येक सीनला अपीलींग बनवलं आहे. सिनेमा इमोशनल डेप्थच्या बाबतीत सिनेमा काहीसा कमी पडतो.

मसाला, ऍक्शन आणि स्टार पॉवर यांचा संगम घडवून आणलेल्या या सिनेमाला थिएटरमध्ये अनुभवायची मजा काही औरच आहे.

तळटीप:- कन्नड इंडस्ट्रीतल्या उपेंद्र बद्दल आपण स्वतः अनुभव घेतला तर बरं राहिलं म्हणून त्याविषयी काहीही लिहणं टाळतोयं.

--©️ महाराष्ट्र सोशल मीडिया✍️



संबधित बातम्या