पुरंदरच्या लोणच्याला ‘एअर इंडिया’त मानाचे स्थान!

पुरंदर पुणे, दि. 24 : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद गावातील संदीपकुमार सीताराम कादबाने यांच्या त्रिवेणी फूड्स इंडस्ट्रीज ने आपल्या मेहनतीच्या जोरावर अन्नप्रक्रिया उद्योगात नवे यश मिळवले आहे.
त्यांच्या या कंपनीच्या उत्पादनांना देशभर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे.
नुकतेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमान प्रवासादरम्यान या कंपनीचे लोणच्याचे उत्पादन पाहिले आणि चव घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या उत्कृष्टतेचे कौतुक केले.
या वेळी त्यांच्या बरोबर मातोश्री सौ. प्रतिभा ताई पवार व देशाचे आदरणीय ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब ही होते.
"ही चव अप्रतिम आहे. पुरंदर तालुक्यातील या स्थानिक ब्रँडमुळे येथील उद्योगाला नवी ओळख मिळेल," असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट केला आहे.
त्यांच्या या प्रशंसात्मक शब्दांमुळे स्थानिक उत्पादक आणि उद्योजकांना अधिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्रिवेणी फूड्स इंडस्ट्रीजच्या या यशामुळे परिसरातील शेतकरी आणि उद्योजकांना नवी प्रेरणा मिळणार आहे.

शिरीष कादबाने (shirish kadbane)
प्रभारी अध्यक्ष,
महाराष्ट्र सोशल मीडिया,
महाराष्ट्र राज्य