महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर तालुक्याचा खरा विकास झाला आहे का ? सतीश(भाऊ)साबळे

इंदापूर तालुक्याचा खरा विकास झाला आहे का ? सतीश(भाऊ)साबळे
1 y 1 m 5 hrs 9 min 58 sec ago Baramati, Maharashtra, India

इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेळावा मध्ये रोहित दादा पवार व सुप्रिया ताईंनी नाव न घेता मलिदा गॅंग असे बोलत इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला..

का आणि कशासाठी हे उद्गार काढण्यात आले यामागील थोडीशी माहिती घेऊया.

मलिदा गॅंग काय आहे..

फक्त आणि फक्त स्वतःची माणसं मोठी केली आहेत..

फक्त आणि फक्त जिथे मिळतंय तेच प्रकल्प इंदापूर तालुक्यात राबवली आहेत..
आणि राबवली जात आहेत.

मित्रांनो बंधूंनो यात काही तथ्य नाही खूप त्रास आहे आमदारकीचा असे म्हणून कार्यकर्त्यांना वेड लावले आहे..


सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलत नसून काही कार्यकर्ते चहापान बंगल्यावर वाटायचं काम करत आहेत...

काही चमच्यांवर मी निशाणा साधल्यामुळे ते चमचे आज त्यांच्यासोबत दिशेनासे झाले आहेत..

पण ते त्यांचे काम चमचेगिरीचे चोख करत आहेत...

यांच्याबरोबर कोणताही नेता फिरलेला आजपर्यंत दिसला नाही चार बालिश पोरं किंवा इकडचे तिकडचे करणारी चमचे, ज्यांना मिळण्याची अपेक्षा आहे अशी फ्रॉड मंडळी..

यांच्याकडे चांगल्या माणसाला बदनाम करणारी एक टीम आहे.. कोणत्या ना कोणत्या कचाट्यात कसा सापडेल किंवा त्याला कसा बदनाम करायचा हाच त्यांचा धंदा आहे..

सुज्ञ जनतेच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत..


इंदापूर तालुक्यात खूप मोठा उद्रेक यांच्याविरुद्ध जमा झाला आहे तरी यांना त्यामध्ये कोणताही बदल झाला असं वाटत नाही..

उपासीतापाशी गरीब जनता अनेक युवक वर्ग मध्यमवर्ग जुना कार्यकर्ता वर्ग जुने बुजुर्ग लोक यांना जाऊन विचारा...

की..

खरा इंदापूर तालुक्याचा विकास झाला आहे का ?

संबधित बातम्या