महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

नसरापूर प्रकरण: पूर्वीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्षच ठरले जीवघेणे? महाराष्ट्र सोशल मिडिया

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात कांबळेने ७५ वर्षांच्या एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर तिच्याच घरात घुसून कोयत्याच्या धाकावर अत्याचार केल्याचा आरोप होता.
नसरापूर प्रकरण: पूर्वीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्षच ठरले जीवघेणे? महाराष्ट्र सोशल मिडिया
10 hrs 46 min 55 sec ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मीडिया ;- नसरापूर येथे घडलेल्या चार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने राज्य हादरले असताना, आरोपी भीमराव कांबळे याच्या भूतकाळातील धक्कादायक घटनांची मालिका समोर येत आहे. या आधीही त्याच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते, मात्र प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटत गेला, ही बाब चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात कांबळेने ७५ वर्षांच्या एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर तिच्याच घरात घुसून कोयत्याच्या धाकावर अत्याचार केल्याचा आरोप होता. घटनेनंतर पीडित महिला भीतीने मुलीकडे निघून गेली. साक्षीदारांनी पुरावे असल्याचे सांगितले, तरीही हा गुन्हा न्यायालयात टिकला नाही आणि आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.


दुसऱ्या घटनेत, कांबळेने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घरात बोलावून, जबरदस्तीने आत ओढून कोयत्याच्या धाकाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुलीने धैर्याने प्रतिकार करत स्वतःचा बचाव केला. तिने शिक्षण, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळत चार वर्षे न्यायासाठी लढा दिला. तरीही शेवटी तिला न्याय मिळाला नाही.


या दरम्यान, स्वतःच्या मुलीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून, त्यामुळे तिला सुरक्षिततेसाठी नातेवाईकांकडे पाठवण्यात आले होते.


पुण्यातील येरवडा परिसरातही एका महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचे समोर येत असून, त्या वेळी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण केली होती.


आणि आता, या सर्व घटनांनंतर पुन्हा एकदा चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.



व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह


या प्रकरणात केवळ आरोपीला शिक्षा होणे पुरेसे नाही, तर याआधीच्या सर्व प्रकरणांमध्ये पोलिस आणि न्यायव्यवस्थेने नेमकी कोणती भूमिका बजावली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. वारंवार गुन्हे करूनही आरोपी सुटत राहिला, यामुळे त्याचे धाडस वाढले का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.


पत्नीच्या भूमिकेचीही चौकशी आवश्यक

या प्रकरणात आरोपीच्या पत्नीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही प्रकरणांमध्ये तिने आरोपीच्या बाजूने भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. जर यात तथ्य आढळले, तर तिचीही सखोल चौकशी होऊन आवश्यक ती कारवाई होणे अपेक्षित आहे.

समाजासाठी संदेश: ‘बोलणं’ हाच पहिला बचाव


या सर्व घटनांमधून एक स्पष्ट संदेश मिळतो — अन्याय सहन करणे हा पर्याय नाही. संबंधित पीडित मुलीने धैर्याने आवाज उठवला, म्हणून ती स्वतःचा बचाव करू शकली.


आपण बोलत नाही म्हणून समाज बदलत नाही” — ही जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणं हा पहिला प्रतिबंधात्मक उपाय आहे — मग ते

ऑनलाईन ट्रोलिंग,

लैंगिक छळ,

घरगुती हिंसा,

किंवा कार्यस्थळावरील अत्याचार असो.

वेळीच बोललं, तरच अन्याय थांबू शकतो.

महाराष्ट्र सोशल मीडिया

संबधित बातम्या