महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी धनाजी पिसे यांची निवड.

महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी धनाजी पिसे यांची निवड.
16 hrs 28 min 15 sec ago Baramati, Maharashtra, India


माळशिरस : महाराष्ट्र सोशल मीडिया संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी धनाजी पिसे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनाजी पिसे हे सामाजिक, राजकीय तसेच डिजिटल माध्यम क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघटनेने त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी बोलताना धनाजी पिसे यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सोशल मीडियाची ताकद गावागावात पोहोचवून युवकांना डिजिटल क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”

त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


या निवडीबद्दल महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष-सतीश{भाऊ}साबळे , कार्याध्यक्ष-रमेश(तात्या)पाटील, प्रभारी अध्यक्ष- शिरीष कादबाने राज्य कार्यकारणी सदस्य राकेश कपूर , राज्य संघटक- आण्णासाहेब साळुंखे, . राज्य कार्यकारणी सदस्य तथा मुंबई अध्यक्ष गणेशजी मुळेपाटील राज्य कार्यकारणी सदस्य-हेमाताई बाकळे , विदर्भ राष्ट्रीय प्रवक्ते-सुनील ठाकरे(पुसद,यवतमाळ) महाराष्ट्र सोशल मीडियाचे लीगल ॲडव्हायझर एडवोकेट-राहुल जी निकाळजे

संबधित बातम्या