महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

९० च्या दशकातील अनेक गाण्यांमधील आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री रविना टंडन हिचा जन्मदिवस.

९० च्या दशकातील अनेक गाण्यांमधील आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री रविना टंडन हिचा जन्मदिवस.
October 27, 2025 02:00 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया रविना टंडन यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९७४ ला मुंबई येथे झाला. वडील रवि टंडन हिंदी चित्रपटांचे निर्माता होते तर आई वीणा टंडन गृहिणी होत्या. रविना यांचा भाऊ राजीव टंडन असून, तो ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रविनाचे प्राथमिक शिक्षण जमनाबाई नर्सी स्कूल जुहू येथे झाले. मीठीबाई कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. लहानपणापासूनच चित्रपटात काम करायचे असल्याने, त्यांनी ही ऑफर स्वीकारली.

हा चित्रपट होता १९९२ मध्ये आलेला शांतनू शीरोय यांचा पत्थर के फूल. या चित्रपटांने त्यांनी भरपूर प्रसिध्दी मिळाली. त्यामुळे मीठीबाई महाविद्यालयात त्यांना पाहण्यासाठी फॅन्सची गर्दी होवू लागली. त्यामुळे नाईलाजाने त्यांना कॉलेज आणि पर्यायाने शिक्षण सोडावे लागले. पदार्पणाच्या चित्रपटालाच यश मिळाल्याने, एकाच चित्रपटात रविना अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावली. या चित्रपटानंतर त्यांना दिलवाले हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याकाळातील सर्वाधिक कमाई केली.

यानंतर रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपटातून कामे केली यात मोहरा, खिलाडियों का खिलाडी, जिद्दी, अंदाज अपना अपना, अक्स, घरवाली बाहरवाली, लाडला. व्यावसायिक चित्रपटांसोबत रविना यांनी गंभीर भूमिका साकारण्यासाठीदेखील मेहनत घेतली आहे. यात सत्ता, शूल, अक्स, दमन या चित्रपटांचा समावेश आहे. यातील सत्ता या चित्रपटाकरिता सर्वश्रेष्ठ अभिनेत्री स्क्रीन अ‍ॅवार्ड, अक्स करिता फिल्मफेअर स्पेशल परफार्मन्स अ‍ॅवार्ड मिळाला आहे. दमन या चित्रपटाकरिता रवीनाला राष्ट्रीय पुरस्कार

गोविंदासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर आवडली. गोविंदासोबत त्यांनी केलेले दुल्हेराजा, राजाजी, अखियों से गोली मारे हे चित्रपट गाजले. रविना यांनी चित्रपटाव्यतिरिक्‍त दूरचित्रवाहिनीवर इसी का नाम जिंदगी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. १९९० ला अविवाहित असतानांच रविनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. सध्या पती व्यावसायिक अनिल थडानी आणि मुलगी राशा (जन्म १६ मार्च २००५) यांच्यासोबत आपल्या दत्तक मुलींसोबत राहत आहेत.

पहिल्याच चित्रपटाला लक्स न्यू फेस ऑफ द इयर पुरस्कार घेतल्यानंतर १९९४ मोहरा या चित्रपटातील तू चीज बडी है मस्त मस्त या गाण्यामुळे त्यांना मस्त मस्त गर्ल हे नवे नाव मिळाले. १९९४ मध्ये रवीनाचे तीन सुपरहिट चित्रपट आले. यात मोहरा अक्षयकुमारसोबत, दिलवाले अजय देवगनसोबत तर सलमान आणि आमिर खान सोबत अंदाज अपना अपना. तीनही चित्रपटातील भूमिका ह्या वेगळ्या होत्या. यानंतर रविवाने दोन वर्षांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. पुनरागमन केल्यानंतर गोविंदा, महिमा चौधरी यांच्यासोबत २००६ मध्ये सॅडविच या चित्रपटात काम केले मात्र हा चित्रपट सपाटून आपटला. यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले.

२००६ नंतर रवीनाने पुन्हा एकदा २०११ मध्ये चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. त्या वर्षीच्या त्यांच्या चित्रपटाचे नाव होते 'बुठ्ठा होगा तेरा बाप' ज्याचे दिग्दर्शक होते 'पुरी जगन्नाथ'. रवीनाने या चित्रपटात 'कामिनी' ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

२०१५ मध्ये अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेलवेट या चित्रपटातून पुन्हा पुनरागमन केले. यात त्यांनी आपल्या मुलीच्या खूनाचा बदला घेणारी आई रंगवली होती. या चित्रपटाकरिता यांना सर्वश्रेष्ठ क्रिटीक अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके अ‍ॅकडमी, लायन्स गोल्ड व बॉलिवूड फिल्म जर्नलिस्टस्चा पुरस्कारदेखील मिळाला.

२०१७ मध्ये, रवीनाने पुन्हा एकदा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाचे नाव होते 'शब', ज्याचे दिग्दर्शक होते 'ओनीर'. या चित्रपटात रवीनाने 'सोनल मोदी' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती आणि रवीना टंडन, आशिष बिश्त, गौरव नंदा आणि अर्पिता चॅटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०१९ मध्ये रविनाने कन्नड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. कन्नड चित्रपट 'के.जी.एफ.चॅप्टर २ मधील 'रमेका सेन'ही भूमिका त्यांनी साकारली होती. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्‍त रविना यांनी तमीळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटातूनही अभिनय केला आहे.

ओटीटी चॅनल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या आरण्यक या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री रवीना टंडनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच सद्यस्थितीत जिओ सिनेमावर २७ जुलै २०२३ ला प्रदर्शित झालेल्या वन फ्रायडे नाईट या वेबसिरीजमधील रविना टंडन यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शक मनीष गुप्ता आहेत तर ज्योती देशपांडे आणि मनीष त्रिहान यांनी निर्मिती केली आहे.वाढदिवसानिमित्त रविना यांचे अभीष्टचिंतन!


- सतीश साबळे 9527817676

संबधित बातम्या