महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

छत्रपती निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला संधी मिळण्याची शक्यता

 छत्रपती निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला संधी मिळण्याची शक्यता
5 m 1 d 17 hrs 4 min 31 sec ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर दि. 23: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवड प्रक्रियेत यंदा बौद्ध समाजाला एसी प्रवर्गातून संधी मिळेल.

कारण काय? तर समाजातून अपेक्षेपेक्षा खूप कमी अर्ज आले – फक्त सात! त्यातलेही एक प्रभावी उमेदवार, राजेंद्र भोसले यांचा फॉर्म तांत्रिक कारणामुळे बाद झाला. आणि बघता बघता संधी हातातून निसटली.

"भोसले सर खूप दमदार होते. त्यांना संधी मिळाली असती, तर चित्र वेगळं असतं," असं अनेकांनी दुःखाने म्हटलं.

आता उरलेले सहा उमेदवार शिल्लक आहेत. समाजातील काही ज्येष्ठांनी पृथ्वीराज बापू यांच्याकडे यापैकी कुणालातरी संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

लोक म्हणतायत – "एकत्र आलो असतो, तर आपल्या समाजातलंच नाव पुढं आलं असतं. पण आपणच गप्प बसलो, त्यामुळे दुसरे पुढं गेले."

पुण्यात जिल्हाध्यक्ष पद मिळालं आबणे ताईंना, बारामतीचे नगराध्यक्ष झाले बोबडे ताई – दोघंही चर्मकार समाजातून. आणि आपण मात्र फक्त पाहत राहिलो.

हा क्षण खूप शिकवणारा आहे – पुढच्या वेळी आपण गप्प बसायचं नाही, एकत्र यायचं, आणि संधीच्या वेळी झोपायचं नाही, हेच ठरवलं पाहिजे.

संबधित बातम्या