जंक्शन MIDC संलग्न क्षेत्र प्रस्ताव उद्योग विभागाकडून महसूल विभागास सादर करण्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना
राज्याचे कृषीमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. भरणे मामा यांचा पाठपुरावा
यावेळी राज्याचे कृषीमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मा. भरणे मामा व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, दि. 25 : राज्याचे कृषीमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार मा. भरणे मामा यांच्या मतदारसंघातील प्रस्तावित जंक्शन ‘एमआयडीसी’साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 1000 एकरहुन अधिक क्षेत्र निशुल्क देण्यात यावे व शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.
पूर्वी झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून महसूल विभागाकडे संलग्नतेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृह हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मा. भरणे मामा व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या 'एमआयडीसी’मुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सुहास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल व उद्योग विभागाचे अधिकारी, VC द्वारे पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, midc चे अधिकारी श्री. हनुमंत पाटील इतर सहकारी उपस्थित होते.


