माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक पदी मळदचे महादेव शेंडे यांची निवड.

बारामती : राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या सुचनेनुसार माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक पदी आज मळद गावातील कामगार महादेव आप्पाजी शेंडे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी चेअरमन श्री केशवराव बापू जगताप माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे व्हाइस चेअरमन राजेंद्र नाना ढवाण पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच कामगार नेते राजेंद्र तावरे व संघटनेतील सहकारी यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. नितीन दादा शेंडे यांनी अजित दादा पवार साहेब खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार आणि संचालक मंडळाचे आभार मानले.
यावेळी केशवराव बापू जगताप, संचालक मदनराव देवकाते सुरेश राव खलाटे राजेंद्र तावरे यांनी अभिनंदन पर भाषण केले. या वेळी दूध संघाचे संचालक शहाजी काका गावडे पाटील रामचंद्र नाना मदने दादा राम झगडे बाळासाहेब गवारे युवराज नाना शेंडे नाना गावडे पाटील सागर गावडे पाटील त्रिंबक अप्पा सातव किरण गावडे पाटील राजेंद्र ढवाण विशाल गायकवाड सर राजेंद्र गायकवाड बाळासाहेब शेंडे संजय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मळद गावाला पहिल्यांदाच हे पद मिळाल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.