महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आपल्या देशात श्री. नरेंद्र मोदी यांचा इतका द्वेष का करतात?

आपल्या देशात श्री. नरेंद्र मोदी यांचा इतका द्वेष का करतात?
May 30, 2023 03:42 PM ago , Maharashtra, India

कारण मोदी हे प्रचंड जाहिरात केलेले सुमार व्यक्तिमत्त्व आहे. मोदी आल्यानंतर भारताचा विकास दर संथ झाला आहे. भारताच्या पंतप्रधान पदी दिवस भरणारा माणूस बसवला तरी भारत ५% गतीने वाढायला हवा. अशी बहुतेक अर्थशास्त्रज्ञांची अटकळ आहे. मोदी काही बाबी चांगल्या केल्या असल्या तरी काही तुघलकी निर्णयांमुळे नुकसान जास्त झाले आहे. भाजप मध्ये शिकलेल्या लोकांची कमतरता असल्यामुळे बांधकामांवर जास्त भर दिला जातो. महाराष्ट्रात भाजपचे फडणवीस आल्यानंतर समृद्धी महामार्ग बांधण्यापलीकडे जास्त काही करू शकले नाहीत. त्यात राज्याचा विकासदर त्यांनी चांगलाच खाली आणला. त्यामुळे सुमार व्यक्तींपासून देश पुढील काळात दूर रहावा यासाठी केलेले प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नात सफल होण्यासाठी केलेला आटापिटा आहे कारण अंधभक्तांचे प्रमाण विवेकबुद्धी नसल्याने प्रचंड आहे. हा आटापिटा अंधभक्तांना द्वेष वाटत आहे. १६० किमी/ प्रतितास धावणाऱ्या ईएमयूचे (वंदे भारत) उद्घाटन करण्यासाठी छोटी छोटी स्थानके सुद्धा सोडली नाहीत. पंतप्रधान दर्जाचा नेता रेल्वे राज्यमंत्र्याचे काम चोखपणे बजावत आहे. कारण १० वर्षांचा हिशेब काय दाखवणार. न पेलवेल असे कर्ज घेऊन छोट्या शहरात उभारलेले मेट्रो प्रकल्प म्हणजे खायला नाही दाणा मला बाजीराव म्हणा. ठाणे महापालिकेला एकुलते एक असलेल्या छत्रपती शिवाजी रूग्णालयाचा खर्च झेपत नाही. तिथे मेट्रोचा पांढरा हत्ती कसा पोसणार व भरमसाठ कर्ज भरणार ते देव जाणे. अंधभक्ताकडे उपाय असेल तर जरूर सुचवावा. धन्यवाद.

संबधित बातम्या