छत्रपती शिवराय जगाचे स्फूर्तीस्थान: छत्रपतींचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची परवानगी मिळावी
जाखणगावचे शेतकरी पुत्र व स्फूर्तीस्थानाचे प्रेरक संजय भगत यांची मागणी.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अथवा स्फूर्तीस्थान उभारण्याची सातारा जिल्ह्यामध्ये परवानगी मिळावी, अशी मागणी जाखणगाव, तालुका खटाव येथील संजय बाबासाहेब भगत यांनी केली आहे.
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अथवा स्फूर्तीस्थान उभारण्याची सातारा जिल्ह्यामध्ये परवानगी मिळावी, अशी मागणी जाखणगाव, तालुका खटाव येथील संजय बाबासाहेब भगत यांनी केली आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहे. अशा युगपुरुषाचा जागतिक दर्जाचा जगातील सर्वात उंच पुतळा सातारा जिल्ह्यात उभारण्यास परवानगी मिळावी, तो परिसर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती स्थान म्हणून विकसित केला जावा, सातारा या नावाऐवजी नाव बदलून राजधानी सातारा असा प्रस्ताव तयार केला जावा. त्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी द्यावी, या तिन्ही विषयासंदर्भात येत्या 10 दिवसाच्या कोणतीही तारीख जाहीर करून त्या दिवशी सातारा जिल्ह्यात विशेष ग्रामसभा बोलावून हे तीन ठराव ग्रामसभेत मंजूर करून घ्यावेत, अशी मागणी येथील शासकीय विश्रामगृहात भगत यांनी केली.
त्यावेळी ते म्हणाले की, शिवस्फूर्ती स्थान हे पर्यटनदृष्ट्या आणि प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून त्याची आखणी करावी. याबाबत राज्य शासनाने गांभीर्य बाळगावे जर यासाठी शासन सर्व परवानग्या देत असेल तर हे रयतेच्या राजाचे स्फूर्तीस्थान रयत स्वखर्चातून करेल शासनास यासाठी एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही.