महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मी जेव्हा सोशल मिडिया वर व्यक्त होतो तेव्हा ... सतिश(भाऊ)साबळे

सामान्य जनतेचे प्रश्न व्यवस्थेला न घाबरता मांडेल तेव्हाच तो जनतेच्या मनातील नेता होईल.
मी जेव्हा सोशल मिडिया वर व्यक्त होतो तेव्हा ... सतिश(भाऊ)साबळे
June 11, 2024 01:09 PM ago Baramati, Maharashtra, India

मी जेव्हा बोलतो तेव्हा फुल Conviction ने बोलतो. मी जेव्हा सोशल मिडिया वर व्यक्त होतो तेव्हा तो सर्वप्रथम फक्त माझाच नव्हे तर सामान्य कष्टकरी जनतेचा आवाज असतो. जेव्हा प्रत्येक पुढारी किंवा कार्यकर्ता सामान्य जनतेचा आवाज बनेल, सामान्य जनतेला काय हवे आहे ते समजावुन घेईल, सामान्य जनतेचे प्रश्न व्यवस्थेला न घाबरता मांडेल तेव्हाच तो जनतेच्या मनातील नेता होईल.

स्वतःला एका विशिष्ट चौकटीत बांधुन ठेऊन, हाजी हाजी करणार्या गोतावळ्यात राहुन जर एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना वाटत असेल की आम्ही समाजात वावरतो व आम्हालाच खुप समजते व आम्ही आता नेते झालो तर ही समज स्वतःचा व त्याचबरोबर त्या "चौकटीची" सुध्दा वाट लावेल.

माणसाला देवाने एक सर्वात मोठी क्षमता दिली आहे.."व्यक्त होण्याची व प्रश्न विचारण्याची क्षमता". गरज पडली तर देवाला सुध्दा प्रश्न विचारला गेला पाहिजे. जो पर्यंत हे आयुध माणुस योग्य ठिकाणी वापरतो, तो पर्यंतच तो स्वतःला माणुस समजु शकतो. नाहीतर प्राण्यांमध्ये व आपल्यात फरक तो काय..

||रामकृष्ण हरी||

संबधित बातम्या