महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीराज हॉस्पिटल,बारामती येथे हृदयरोग सल्ला निदान व उपचार शिबिर.

5 जुलै ते 31 जुलै 2024 या कालावधीत महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत हृदयरोग सल्ला निदान व उपचार शिबिराचे आयोजन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीराज हॉस्पिटल,बारामती येथे  हृदयरोग सल्ला निदान व उपचार शिबिर.
July 08, 2024 01:02 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे गिरीराज हॉस्पिटल, एसटी स्टँड नजीक इंदापूर रोड, बारामती या ठिकाणी महात्मा फुले योजनेअंतर्गत हृदयरोग सल्ला निदान व उपचार शिबिराचे
आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी या शिबारमध्ये डॉ. रमेश भोईटे, एम.डी मेडिसीन (चेअरमन गिरीराज ग्रुप ) यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जुलै ते 31 जुलै 2024 या कालावधीत मोफत अँजिओप्लास्टी व कार्डियाक बायपास शस्त्रक्रिया
तसेच अँजिओग्राफी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराला येताना पिवळे/केशरी रेशनकार्ड, आधारकार्ड/ मतदानकार्ड, पूर्व तपासणीचे रिपोर्ट बरोबर घेऊन यावे.

तसेच नाव नोंदणी साठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

  • रिसेप्शन- 9225583371,

  • पराग दुधाळ-9420499219,

  • गणेश देसाई-8530435511,

  • सिद्धेश सावंत (GM)- 8530425512,

  • Cath Lab-9673003014

संबधित बातम्या