महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अल्पवयीन मुलीचा मृत्यू

विनयभंगानंतर पाजले होते कीटकनाशक
अल्पवयीन मुलीचा मृत्यू
August 01, 2024 02:51 PM ago Indapur, Maharashtra, India

गुन्ह्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली असून. १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अन्वये ३३३. ७४, ७५,१०९, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ च्या ८ च १२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये खुनाचा गुन्हा ही दाखल करण्यात येणार असल्याचे इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.

इंदापूर: विनयभंग केल्यानंतर कीटकनाशक पाजण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि.३१) सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी रणजीत दाजी जाधव (वय २७, रा. सराटी, ता. इंदापूर) यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.

२८ जुलैला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला इंदापूर पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वकीलवस्ती (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि.२८) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी एकटीच घरी असताना ती शिकत असलेल्या शाळेतील लिपिक असणारा रणजीत जाधव घरी येऊन विनयभंग करत शरीरसुखासाठी बळजबरी करू लागला. ती प्रतिकार करू लागल्याने त्याने, खिडकीमध्ये ठेवलेली शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकाच्या बाटलीचे टोकन काढून तिच्यातील औषध त्या मुलीला पाजले. ती आरडाओरडा करताच तिच्या आजोबांनी बाहेरून दरवाजा वाजवला, त्यानंतर आरोपी जाधव याने दरवाजा उघडुन मुलीच्या आजोबांना ढकलून तो पळून गेला. पीडितेवर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

संबधित बातम्या