महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राजकारण कोणत्या नेत्याला समजलं असेल तर तो नेता म्हणजेच शरद पवार. सतिश(भाऊ)साबळे.

राजकारण कोणत्या नेत्याला समजलं असेल तर तो नेता म्हणजेच शरद पवार.  सतिश(भाऊ)साबळे.
1 m 22 hrs 36 min 15 sec ago Baramati, Maharashtra, India

माणसं मोठी होतात कर्तृत्वाने आणि ह्या मोठेपणाबरोबरच जी विचारांवर कार्य करतात ती विलक्षणच.. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श घेऊन फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर स्वतःला सिद्ध करणारा हा राजकारणातील तेजस्वी तारा, राजकारण कोणत्या नेत्याला समजलं असेल तर तो नेता म्हणजेच शरद पवार.

त्यांच्याबद्दल अनेक जणांच्या तोंडून त्यांच्याबद्दल टीका ऐकलीय पण राज्याच्या अन देशाच्या महत्वाच्या मुद्द्यावर एकमेव पर्याय म्हणजेच शरद पवार हाच होय. "कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती" या उक्तीप्रमाणे पवार साहेब होय. समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण, कृषि, सामाजिक न्याय, नारी सन्मान, कला, क्रीडा, साहित्य यांसारख्या बहुविविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे विश्व म्हणजे साहेब तुम्हीच... राजकारण करताना राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशातही आपण एक एक कार्यकर्ता जोडला अन घडविला. दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर तुम्ही आजपर्यंत दिल्लीवरही वर्चस्व गाजवलं. गोविंदबाग ते 6,जनपथ या प्रवासात किती मेहनत आपण केलीत हे उभ्या जगानं पाहिलं. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, दोन वेळेस कृषीमंत्री हा तुमचा राजकीय प्रवास सर्वसामान्य कार्यकर्त्याला सदैव प्रेरणा देणारा आहे.

तुम्हाला समाज कळाला, त्यांचे प्रश्न कळाले, पण खऱ्या अर्थाने समाजाला तुम्ही कळाले नाहीत ही खूप मोठी शोकांतिका वाटते. मंडल आयोग असो कि मराठवाडा नामांतर घोषणा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहताना आणि त्याची जबर राजकीय किंमत मोजताना तुम्हाला या महाराष्ट्राने पाहिलंय. राज्यातील शेती हा तुमचा तळमळीचा विषय राहिला. या कृषिक्षेत्राला नवे दिवस तुम्ही दिले. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना तुम्ही प्रत्यक्षात आणल्या. त्यावर आजही तुम्ही कार्यमग्न आहात.
शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांचे आधारवड साहेब तुम्ही... महिलांना राजकारणात पुरुषांच्या बरोबरीचा हक्क मिळवून देणारे साहेब तुम्ही... एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करुन समाजापुढे खरा आदर्श निर्माण करणारे साहेब तुम्ही...


साहेब आपल्याला शत-शत प्रणाम !!

सतिश साबळे अध्यक्ष-महाराष्ट्र सोशल मिडिया (महाराष्ट्र राज्य)-९५२७८१७६७६

संबधित बातम्या