पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी वासुदेव नाना काळे यांची निवड
महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांनी केले अभिनंदन
पुणे : राज्यातील राजकीय घडामोडी पाहता सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपने आपल्या जिल्हाध्यक्षांची नवनियुक्ती सुरू केली आहे यामध्ये पुणे जिल्ह्याच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी वासुदेव नाना काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातले पत्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वासुदेव नाना काळे यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीने भाजप पुणे जिल्हा कार्यकारणीत उत्साह संचारला असून येणाऱ्या निवडणुकांत अजून जोमाने काम करण्यासाठी सर्वजण आतापासूनच तयारीत लागले आहेत.
पुणे जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून भाजपचे यावरती बारीक लक्ष आहे, त्यामुळे वासुदेव नाना काळे यांची निवड ही महत्त्वाची ठरणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ साबळे तसेच भाजपचे युवराज आण्णा म्हस्के, पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्या शितल ताई साबळे, बाबासाहेब चवरे, माऊली चवरे, नाना गोसावी, मल्हारी जाधव, नामदेव शिंदे, आप्पा दळवी यांनी अभिनंदन केले.