महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सुप्रियाताईंना सर्वात जास्त मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळणार. सतीश(भाऊ)साबळे.

सुप्रियाताईंना सर्वात जास्त मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळणार. सतीश(भाऊ)साबळे.
April 20, 2024 04:31 PM ago Baramati, Maharashtra, India

संसद रत्न सुप्रियाताई यांना इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक मतदान मिळणार आहे असे उद्गार महाराष्ट्र सोशल मीडियाचे अध्यक्ष सतीश(भाऊ)साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

महाराष्ट्र सोशल मीडियाचा इलेक्शन सर्वे चालू असून त्या सर्वेंनुसार .. इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान सुप्रियाताईंना होणार आहे व सुप्रियाताई एक ते दीड लाख मतांनी निवडून येणार आहेत.

इंदापूर तालुका हा दोन्ही ही "एक माजी आमदार आणि एक आजी आमदार" यांचा गड मानला जातो परंतु ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातील लोक हे डिजिटल झाले आहेत त्यांना समजू लागले आहे

"कोणाला साथ द्यायची आणि कोणाची साथ सोडायची"

सध्याचे आमदार माननीय दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्याला विकासाची भुरळ घातली आहे परंतु ह्या विकासाच्या भुलथापांना बळी पडायचे नाही असे ठरवलेले दिसत आहे..

जेव्हापासून रोहित दादांची इंदापूर तालुक्यालील सभेतील भाषणे ऐकून लोकांचा कल तुतारी या चिन्हाकडे अधिक वाढलेला दिसत आहे..

सध्या इंदापूर तालुक्यामध्ये एकच शब्द फेमस झाला आहे तो म्हणजे मलिदा गॅंग..

इंदापूर तालुक्यातील निकृष्ट दर्जाची कामे, आणि त्यामध्ये मिळणारी टक्केवारी ..
जी कामे फक्त पाहुणे-रावळे यांना दिली आहेत.
जी कामे फक्त भरणे इन्फ्रा नावाच्या कंपनीला मिळाले आहेत.
ज्यामध्ये कमिशन मिळत आहे अशीच कामे इंदापूर तालुक्यात राबवली जात आहेत आणि राबवली आहेत..

इंदापूर तालुक्यामध्ये एकही संस्था किंवा एकही कंपनी दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही टर्म मध्ये आणली नाही.. यामुळे लोक इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत..

भाजपमधील काही पुढारी देखील..
बोलताना आम्ही युतीचा धर्म पाळत आहे असे सांगत आहेत परंतु तेही आतल्या गटातून सुप्रियाताईंनाच मतदान करणार आहेत..

इंदापूर तालुक्यातील प्रचंड मोठा नाराज गट या निवडणुकी मधून बाहेर येताना दिसत आहे..आणि याचाच खूप मोठा फायदा सुप्रियाताई यांना मतदान रुपी होणार आहे..असेही सतीश साबळे यांनी सांगितले आहे.

संबधित बातम्या