महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र सोशल मिडियाची राज्यव्यापी मोहीम सुरू; अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र सोशल मिडीया, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांची माहिती.
महाराष्ट्र सोशल मिडियाची राज्यव्यापी मोहीम सुरू; अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
January 01, 2025 08:49 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडीया

!! तुमच्या हक्काचे व्यासपीठ !!

!! आम्हाला साथ द्या .... ...आपण सोबत या !!

'सोशल मिडिया' चे आपल्याला ज्ञान नसले तरी त्याची जाण मात्र आपल्या प्रत्येकाला असलीच पाहिजे. म्हणून उज्वल भविष्य आपल्या समोर एक कायम स्वरूपी प्रेरणा म्हणून सोशल मिडिया'च्या माध्यमातून उभा करण्याचा 'महाराष्ट्र सोशल मिडियाचा' ध्यास आहे. एक नवे घडवण्याचे सामर्थ्य आम्हाला आमच्या याच 'महाराष्ट्र सोशल मिडियाने' दिले आहे.

याच प्रेरणेतून आज कित्येक लोक आप आपल्या परीने काही तरी करीत आहेत किंवा काही तरी करण्याची प्रकट इच्छा बाळगून आहेत. अश्या सर्व सामाजिक भान असणार्या लोकांसाठी 'महाराष्ट्र सोशल मिडिया' हे एक व्यासपीठ म्हणून काम करेल. आजच्या तरुण पिढी समोर काही प्रश्न उभे आहेत जसे कि, काय करावे? कसे करावे? आणि कुठे करावे? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 'महाराष्ट्र सोशल मिडिया' एक माध्यम म्हणून सदैव आपल्या सोबतीला असेल.

सध्या वाढत चाललेली सामाजिक आणि आर्थिक दरी, शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या, शिक्षण, नौकरी- व्यवसाय या सारख्या तरुणांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम 'महाराष्ट्र सोशल मिडिया' च्या माध्यमातून केले जाईल. त्या साठीचे मार्गदर्शन त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या मार्फत केले जाईल. महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत विकासाची गंगा पोहचवणे हे एक उद्दिष्ट आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकासाच्या योजनांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन 'महाराष्ट्र सोशल मिडिया' च्या माध्यमातून केले जाईल.

आज समाजामध्ये असे असंख्य लोक आहेत जे आपल्या वैयक्तिक पातळीवर किंवा एका छोट्या ग्रुप च्या साह्याने अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काही तरी करत असतात. अश्या लोकांनी आज समाजासमोर येण्याची वेळ आली आहे. जिथे सगळी कडे दुष:प्रवृत्तींनी आप आपल्या सीमा ओलांडायला सुरुवात केली आहे, तेव्हा त्या विरुद्ध लढा देण्यासाठी आपण सर्वांना एकत्रितरित्या उभे करण्याचा प्रयत्न 'महाराष्ट्र सोशल मिडिया' करीत आहे.

'महाराष्ट्र सोशल मिडिया' च्या माध्यमातून एक टीम सतत कार्यरत राहील. हि टीम समाजातील गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, आणि कष्टकर्यांना शक्य होईल त्या प्रकारे सर्वोपतरी मदतीचा हात देईल. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अविकसित भागातील शैक्षणिक दर्जा वाढवणे, त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देणे यासाठी 'महाराष्ट्र सोशल मिडिया लाईव्ह' सतत कार्यशील राहील.

सामाजिक बांधिलकी असणाऱ्या लोकांची एक साखळी निर्माण करून त्यांच्या माध्यमातून हे कार्य सध्या करण्यात येईल. त्या साठी 'महाराष्ट्र सोशल मिडिया' टीम एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय राहणार नाही. आजही आमची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. शहरी विकास, शिक्षण आणि ज्ञान खेड्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि खेड्यातील समस्या शहरी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'महाराष्ट्र सोशल मिडिया' एका सेतू प्रमाणे काम करेल.

या सर्वांसाठी 'महाराष्ट्र सोशल मिडीयाने' ऑनलाइन न्यूज चॅनलच्या माध्यमातून (msmlive.in) एक चळवळ उभी करून महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तींना हक्काचं ऑनलाइन व्यासपीठ उभं करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या साठी जास्तीत जास्त युवकांनी 'महाराष्ट्र सोशल मिडिया' च्या बरोबरीने उभं राहणे गरजेचे आहे.

'महाराष्ट्र सोशल मिडीया'च का?

  • प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावा-गावात आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी.
  • जन माणसाच्या रोज मर्राच्या न्याय हक्कासाठी.
  • छोट्या समस्यामुळे मोठी अप्रिय घटना घडू नये म्हणून सजग करण्यासाठी.
  • आपला हक्क भिक मागून नाही स्वाभिमानाने मिळवण्यासाठी.
  • रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, विज, पिण्याचे पाणी व अन्न-धान्यातील भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी.
  • स्थानिक प्रश्नांची अचूक माहिती घेऊन जागच्या-जागी निपटारा घेण्यासाठी.

राज्य कार्यकारणी:

  • अध्यक्ष: सतिश (भाऊ) साबळे
  • कार्याध्यक्ष: रमेश (तात्या) पाटील (इंदापूर)
  • राज्य प्रवक्ता: सुनील (भाऊ) ठाकरे (पुसद, यवतमाळ)
  • मराठवाडा विभागीय अध्यक्ष: प्रभाकर पांडे (नांदेड)
  • प्रभारी अध्यक्ष: शिरीष कादबाने

ऑफिस पत्ता:
'महाराष्ट्र सोशल मिडिया',
2रा मजला, अब्दुलपुरकर बिल्डिंग, नवीन जैन मंदिर (भिगवण रोड),
हॉटेल मनन च्या वरती, बारामती, पुणे. 413102.

संपर्क: 9527817676 / 9763626288
इमेल: msmlive24@gmail.com
वेबसाईट: www.msmlive.in

!! आम्हाला साथ द्या .... ...आपण सोबत या !!

संबधित बातम्या