राजेंद्र चवरे यांची शेळगाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड; दलित पॅंथरच्या वतीने सत्कार.
सत्कार सोहळ्याप्रसंगी छत्रपती स.सा. कारखान्याचे माजी संचालक आदरणीय लक्ष्मण आबा शिंगाडे,
शेळगाव: ग्रामपंचायत शेळगावच्या उपसरपंचपदी मा. राजेंद्र चवरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल दलित पॅंथर संघटनेच्या वतीने त्यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी छत्रपती स.सा. कारखान्याचे माजी संचालक आदरणीय लक्ष्मण आबा शिंगाडे, विलास अण्णा भांगे आणि विठ्ठल शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच दलित पॅंथर मुस्लिम आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमीन भाई शेख, कार्याध्यक्ष दिलावर भाई शेख, गुलाब शेख, रशीद भाई पटेल, इरफान मुलानी, जावेद मुलानी, बिलाल शेख, युनुस सय्यद, शंकर खरात, नानासो जाधव, रफिक भाई शेख आणि इक्बाल शेख या मान्यवरांच्या हस्ते मा. राजेंद्र चवरे यांचा सन्मान करण्यात आला.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. राजेंद्र चवरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत
आहे.
