महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आपलं नॉट रिचेबल असणं ही मीडियासाठी मोठी बातमी व्हायची दादा आता कायमच सोडून गेलात. सतिश(भाऊ)साबळे.

आपलं नॉट रिचेबल  असणं ही मीडियासाठी मोठी बातमी व्हायची दादा       आता कायमच सोडून गेलात. सतिश(भाऊ)साबळे.
January 28, 2026 05:38 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया अतिशय_दुःखद_घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का देणारी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन युवक-युवती, सर्वसामान्य जनता आणि स्वाभिमानी मराठी माणसाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे, आक्रमक भूमिका घेऊन अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले. अशा प्रकारे एखादे व्यक्तिमत्त्व हरपले, की केवळ एक घर किंवा एक पक्ष नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना निर्माण होते.

या दुःखद घटनेची तीव्रता शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी, तर कोणत्या शब्दांत करावी, असा प्रश्न पडतो—कारण त्यांनी केलेले कार्य, त्यांनी समाजासाठी दिलेला वेळ आणि संघर्ष अतुलनीय आहे.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि सर्व स्वाभिमानी मराठी लोकांसाठी अत्यंत काळा दिवस आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर सर्वसामान्य माणसाचा खरा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, ते व्यक्तिमत्त्व केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते; ते सर्व समाजासाठी, सर्व लोकांसाठी काम करणारे होते.

ही घटना अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून, महाराष्ट्राने आज एक मोठे नेतृत्व गमावले आहे.


त्यांच्या कार्याला आणि स्मृतीस विनम्र श्रद्धांजली????????????????

संबधित बातम्या