महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा! महाराष्ट्र सोशल मीडियाकडून कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर आवाहन

इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र सोशल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश (भाऊ) साबळे यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा!    महाराष्ट्र सोशल मीडियाकडून कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर आवाहन
17 hrs 45 min 18 sec ago Baramati, Maharashtra, India

इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा!


महाराष्ट्र सोशल मीडियाकडून कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर आवाहन


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पावसाची अनिश्चितता आणि शेतीसमोरील वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र सोशल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश (भाऊ) साबळे यांनी केली आहे.


तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीच्या वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत असल्याचे सांगत, शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.


“शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष न करता इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात,” असे जाहीर आवाहन महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांना करण्यात आले आहे.


दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाच्या निकषांनुसार परिस्थितीचे सर्वेक्षण करून आवश्यक निर्णय घेण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


सतीश (भाऊ) साबळे

राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र सोशल मीडिया

शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल!

संबधित बातम्या