महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शेळगाव (इंदापूर) येथे दलित पॅंथर मुस्लिम आघाडीतर्फे वारकऱ्यांना बिस्किट वाटप!

शेळगाव (इंदापूर) येथे दलित पॅंथर मुस्लिम आघाडीतर्फे वारकऱ्यांना बिस्किट वाटप!
15 hrs 4 min 6 sec ago Baramati, Maharashtra, India

शेळगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सामाजिक सलोख्याचे दर्शन.

शेळगाव / तालुका इंदापूर (जिल्हा पुणे):

दलित पॅंथर मुस्लिम आघाडी (शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) च्या वतीने शेळगाव ते पंढरपूर येथे निघालेल्या श्री संत मुक्ताबाई प्रस्थान च्या वेळेस बिस्किट वाटप करण्यात आले .

या उपक्रमाद्वारे दलित आणि मुस्लिम समाजाने एकत्र येत सामाजिक सलोखा व वारकरी संप्रदायाप्रती आदराची भावना जपली. पालखी सोहळ्यात तहान-भूक विसरून चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करून सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

सदर प्रसंगी उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते:

रमेशभाई पारधे(ज्येष्ठ नेते, दलित पॅंथर )

अमीनभाई शेख (प्रदेश उपाध्यक्ष, दलित पॅंथर मुस्लिम आघाडी, महाराष्ट्र)

दिलावरभाई शेख (कार्याध्यक्ष, दलित पॅंथर मुस्लिम आघाडी)

उपस्थित पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते:

रफिकभाई शेख, इब्राहिम शेख पठाण,दादाभाई पटेल, राऊतभाई शेख, हुसेनभाई सय्यद, मच्छिंद्र गावडे, ईसाकभाई शेख ,जाकीरभाई शेख, बिलालभाई शेख ,फकीरभाई शेख, जुबेरभाई शेख ,पप्पूभाई शेख, जावेद मुलाणी

"वारकरी सेवा हीच ईश्वरसेवा!"

दलित पॅंथर मुस्लिम आघाडी, शेळगाव (इंदापूर)

संबधित बातम्या