गावापासून सुरुवात करा मंग तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा विचार करा. सतीश(भाऊ)साबळे
सन्माननीय मित्रांनो आदरणीय जे लोक वयाने मोठे आहेत त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो.. आणि काही गोष्टी.. बोलू इच्छितो..
आज काही गोष्टी किंवा काही वर्षांपासून ज्या गोष्टी भारत देशांमध्ये चालू आहेत त्याचा मनोमन सर्व लोक विरोध करत आहेत.. पण त्या गोष्टींना कदाचित आपण पाठिंबा देत आहे.. कारण काही गोष्टी आपल्या गावातूनच सुरुवात करा.. नंतर तालुक्याचा परत जिल्ह्याचा.. आणि हो जिल्ह्याचा झाल्यावर महाराष्ट्राचा विचार करा.. बघा परत एकदा हे शब्द नीट वाचा...
आपण गावातली घाण जर व्यवस्थित रित्या काढू शकत नाही तर तालुक्याची, जिल्ह्याची आणि हो महाराष्ट्राची घाण काढण्याची स्वप्ने सोडून द्या..
घाणेरडे ते लोक नाहीत तुम्ही लोक आहात. जे जे तलाठीला किंवा ग्रामसेवकाला एखादे कागद लिहून दिले की लगेच पैसे देता.. तलाठी ग्रामसेवक हा चुकीचा नाही.. तुम्ही लोक चुकीचे आहेत.. जर तो पैसा मागत असेल.. video चालू करून कानाखाली जोरदार चपराक लावा..
मित्रांनो तो पगारी अधिकारी आहे आणि काम करण्याचा त्याला पगार मिळत आहे जो पैसा तुमच्याकडून तो घेत आहे तो लीगली नाही.. किंवा त्याच्या हाताखाली जर कोण पैसा मागत असेल.. आणि कामांमध्ये विलंब लावत असेल तर त्याला चार दोन एकत्र मिळून.. व्हिडिओ चालू करून त्याला तुडवा.. गावापासून सुरुवात करा.. मंग बाकीचा विचार करा..
