महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी - सौ.रीताताई बाविस्कर

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी -  सौ.रीताताई बाविस्कर
February 15, 2024 03:49 PM ago Mumbai, Maharashtra, India

येणाऱ्या काळात सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील ग्रंथालयांना विश्वासात घेऊन जोमाने काम करणार असून राज्यातील ग्रंथालय संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार. - सौ. रीताताई बाविस्कर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ. रीताताई बाविस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय नामदार श्री. अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा खासदार श्री.सुनीलजी तटकरे साहेब, माननीय नामदार श्री. अनिल दादासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन, श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, श्री.संजय बोरगे साहेब आदी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागातील पदाधिका-यांनी प्रवेश घेऊन ग्रंथालय विभागाचे श्री. संतोष दगडगावकर (प्रदेश कार्याध्यक्षपदी), श्री. प्रशांत लोंढे (प्रदेश समन्वयक पदी), श्री. दिपक जगताप (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी), श्री. राहुल पाटील (प्रदेश उपाध्यक्ष पदी), श्री. सय्यम नबी (प्रदेश सरचिटणीस पदी), श्री. प्रभु नारायण उरडवडे (प्रदेश उपाध्यक्ष पदी) निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल महाराष्ट्र सोशल मिडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीनंतर बोलताना सौ. रीताताई बाविस्कर म्हणाल्या की राज्यातील ग्रंथालयाचे अनेक वर्षापासून नवीन शासन मान्यता, ग्रंथालयाचा दर्जाबद्दल, अनुदान दुप्पट आदी प्रश्न प्रलंबित असून येणाऱ्या काळात सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील ग्रंथालयांना विश्वासात घेऊन जोमाने काम करणार असून राज्यातील ग्रंथालय संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबधित बातम्या