महाराष्ट्र सोशल मीडियाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी अत्यावश्यक सूचना.ॲडव्होकेट राहुल निकाळजे

सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी अत्यावश्यक सूचना
१ ) अशी कोणतीही व्यक्ती जिचे वय 18 वर्षाच्या पुढे व 65 वर्षाच्या आत आहे . ज्यांना सामाजिक कार्याची रुची आहे अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची कार्य करण्याची इच्छा मानसिकता आहे. अशा व्यक्ती सदस्य होऊ शकतात.
२) कोणताही सदस्य / पदाधिकारी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतच पदावर राहू शकतो.
३) कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक सदस्य / पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य असून कोणताही सदस्य / पदाधिकाऱ्यांकडून गैरकृत्य होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची असेल.
४) कोणताही सदस्य अथवा पदाधिकारी गैरप्रकरणात मध्यस्थी (दलाली) करणार नाही.
५) कार्य करत असताना आपल्या कार्यक्षेत्रातील अन्याय, अत्याचार ,भ्रष्टाचार, बालमजुरी, सोशल मीडिया उल्लंघन, राजकीय ,सामाजिक, बाबतच्या घटनेवर लक्ष ठेवून अशा गैर कृत्यांची माहिती विना विलंब त्या त्या कार्यालयासह शासन प्रशासन व माध्यमांना देण्यात यावा व त्याची एक प्रत इकडील कार्यालयास देण्याची व्यवस्था करावी.
६) सदस्य पदाधिकाऱ्यांच्या समस्या व कार्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात बैठक आयोजित करण्यात येईल व वर्षातून किमान आठ बैठकांना हजर राहणे प्रत्येक सदस्य पदाधिकाऱ्यांना बंधनकारक आहे.
७) शासन,प्रशासन, राज्य महाराष्ट्र सोशल मीडिया व इतर सामाजिक संस्था, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक सदस्य / पदाधिकाऱ्यांचे आध्य असेल.
८) सर्व सदस / पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आपला संपर्क आपल्या विभाग प्रमुखाशी ठेवावा.
९) संस्थेचे सर्व व्यवहार विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडून चालतात आर्थिक व्यवहाराचे अधिकार त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस नाहीत.
१०) पीडित व्यक्तीने स्वतःहून किंवा तिच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने विनंती अर्ज केला तर अथवा वृत्तपत्रातील वृत्तांच्या आधारे सोशल मीडिया उल्लंघन / दप्तर दिरंगाई आधी घटना तक्रारी ठरू शकतात. पण ज्या तक्रारी न्यायालयाकडे अथवा इतर कोणत्याही लावादाकडे प्रलंबित आहेत. ज्या न्यायप्रविष्ठ तक्रारींमध्ये संस्था सदस्य / पदाधिकारी तक्रार म्हणून स्वीकारू शकत नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास त्या संबंधित विभागाकडे पाठवून द्याव्यात.
११) सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून *महाराष्ट्र सोशल मीडिया* चा प्रचार व प्रसार तसेच संस्थेच्या कार्याची माहिती समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.