महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात सतर्कता बाळगा .

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात सतर्कता बाळगा .
May 16, 2021 01:58 PM ago , Maharashtra, India

मुंबई, 16 मे : कोरोनाशी (Corona) लढा देणाऱ्या भारतावर आता अस्मानी संकट उभे ठाकले आहे. 65 किमीपेक्षा अधिक वेगाने

तौक्ते वादळ (Cyclone Tauktae in Arabian sea) केरळच्या किनारपट्टीकडे निघाले आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात 'तौक्ते' नावाचं चक्रीवादळ घोंघावत आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पण तसं असलं तरी गुजरातला याचा मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे पालघर भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही मुंबईतील काळजी घेतली जात आहे. मुंबईत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शहरातील अनेक भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. तौत्के वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफ (NDRF)च्या टीम्स सुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत. तौत्के चक्रीवादाळात आपत्कालीनल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या 10 टीम्स तैनात करण्यात येत आहेत. या 10 टीम्सपैकी 2 टीम्स गोव्यात, 2 टीम्स सिंधुदुर्गात, 2 टीम्स रत्नागिरीत, 4 टीम्स गुजरातमध्ये उद्यापासून सज्ज राहणार आहेत. तौत्के वादळ वादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. 16 ते 18 मे दरम्यान कोकण आणि गोवा तसेच पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

संबधित बातम्या