महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणीच्या कामाच्या सध्यस्थिती संदर्भात आढावा घेतला., कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

 रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणीच्या कामाच्या सध्यस्थिती संदर्भात आढावा घेतला., कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
August 26, 2025 10:11 PM ago Baramati, Maharashtra, India

मुंबई : आज मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणीच्या कामाच्या सध्यस्थिती संदर्भात आढावा घेतला.

या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव व दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


संबधित बातम्या