करमाळा-वांगी येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी – कृषीमंत्र्यांकडे निवेदन
सोलापूर शिवसेना जिल्हा संघटक मा. संतोष मच्छिंद्र वारगड यांच्या हस्ते कृषीमंत्र्यांना दिले निवेदन.

इंदापूर दि. 31 : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांची आज भेट घेऊन करमाळा-वांगी येथील केळी संशोधन केंद्र तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
शिवसेना जिल्हा संघटक मा. संतोष मच्छिंद्र वारगड यांच्या हस्ते कृषीमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात,
1. करमाळा तालुक्यातील वांगी गावात केळी संशोधन केंद्र मंजूर करून लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
2. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत केळी पिकाचा समावेश करून घेणे.
3. शेतकऱ्यांना केळीची दर्जेदार रोपे तात्काळ उपलब्ध करून देणे.
4. तसेच महाडीबीअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तात्काळ वितरित करणे या मागण्या पुढे मांडल्या गेल्या.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, करमाळा तालुक्यातील जमिनी व हवामान केळी लागवडीस पोषक असून, येथे संशोधन केंद्र सुरू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी कृषिमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष (ओबीसी) सिकंदर ताजुद्दीन मुलानी, केळी बागायतदार अंकुशजी माळशिकारे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनामुळे केळी बागायतदारांच्या समस्या सोडविण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.