महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जाट हे जा*तीवाचक नाव आणि त्यात सनी भाऊ..

जाट हे जा*तीवाचक नाव आणि त्यात सनी भाऊ..
April 22, 2025 04:39 PM ago Baramati, Maharashtra, India

आज चित्रपट पहाण्याची इच्छा झाली 2-3 तासांसाठी उन्हात कुठ जायचं म्हणून जाट चित्रपटाच तिकीट बुक केलं.

जाट हे जा*तीवाचक नाव आणि त्यात सनी भाऊ..

म्हणजे चित्रपटात फुल मारामारी का सीन असणार हे गृहीत धरूनच थिएटर मध्ये घुसलो. आणि अपेक्षेप्रमाणे संगीतकार, ॲक्टर, दिग्दर्शक यांची नाव यायच्या अगोदरच मारामारी सुरू झाली. दिग्दर्शक साहेबांनी थोडीसुद्धा उसंत न घेता लवकर ऍक्शन सुरू केल्याने त्यांच्या बुद्धीचे कौतुक वाटले.

रणदीप हुडा श्रीलंकेतील एका द*हश*तवादी संघटनेचा ex सदस्य असतो. त्याला एकदा पेटी भरून सोन भेटत. ते सोन घेऊन तो डायरेक्ट भारतात घुसतो. एवढ सोन घेऊन दुबई गाठण्यापेक्षा भारत देशात का आला ते मला शेवटपर्यंत समजलं नाही. मग तो इथे आल्यावर पोलिसांना किलोभर सोन देऊन भारताचे नागरिकत्व मिळवतो. हुडाला दिली ओसरी हुड्या हातपाय पसरी या म्हणी प्रमाणे रणदीप हुडा नागरिकत्व मिळालं की इथल्या लोकांवर दादागिरी करायला सुरू करतो. कोणी उलट बोललं की मुंडकं का*पणे, कोणी धावून आला की त्याला जा*ळून टाकने असल्या क्रूर प्रथा सुरू करतो.

घुसखोरांनी कस शांततेत, लपून छापुन राहाव हे फक्त बांगलादेशी लोकांकडूनच शिकावं पण हा बांगलादेशी नसल्याने याच्याच मांडीत लै किडे असतात. 10-15 वर्षात दादागिरी, गुंडगिरी करून याच मोठ साम्राज्य बनत.

आणि मग एके दिवशी सनी देओल सर त्यांच्या गावात इडली खायला उतरतात. इडली खायला सुरुवात केली की एका गुंडाकडून इडलीचे ताट खाली पडते. तो गुंड सनी भाऊंना सॉरी म्हणत नाही आणि एका सॉरी वरूनच चेन रिऍक्शन प्रमाणे मारामारी सुरू होते. छोटया गुंडाला नंतर त्याच्या बॉस ला नंतर बॉसच्या बॉस ला मारत मारत सनी भाऊ डायरेक्ट रणतुंगा म्हणजे रणदीप हुडा पर्यंत पोहचतो.

चित्रपट 2 तास आणि 38 मिनिटांचा आहे त्यापैकी 2 तास आणि 30 मिनिटे फक्त मारामारी आहे. हाफसा उपसायच्या यशानंतर चित्रपटता सनी पाजी पंखा उपासना दिसतात. पुढच्या चित्रपटात रस्त्याच्या कडेला लावलेली वडाची, बाभळीची झाड उपसताना दिसतील.. दिवसातून 3 वेळा शिलाजीत खात असल्यासारखं सनी पाजी 200-300 माणस न थकता सहज बदडून काढत असतात.

चित्रपटात आणखी बरेच ट्विस्ट आहेत. तुम्ही ॲनिमल सारखे चित्रपट आवडणारे ॲनिमल असाल तर तुम्ही असले मारधाड वाले चित्रपट थिएटर मध्ये जाऊन आवडीने पाहू शकता. ज्यांना मारधाड आवडत नाही त्यांना तो ट्विस्ट मी inbox मध्ये सांगू शकतो.

चित्रपटात 2 मराठी कलाकार सुद्धा आहेत. आणि ही दोन्ही मराठी माणसं त्यांच्या बडबड करण्याच्या स्वभावामुळे फुकटची- फाकाट मरतात.चुकीला माफी नाही म्हणणारे मकरंद देशपांडे आणि ॲनिमल चित्रपटानंतर बॉलिवूड वाल्यांच्या नजरेत भरलेला आपला उपेंद्र लिमये. उपेंद्र सरांचे डायलॉग नेहमी प्रमाणे OP आहेत.

चित्रपटात मारामारी सोडली तर उर्वशी रौतेला चे आयटम साँग पाहण्यासारखे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रणतुंगा ची बायको..ती एवढी क्यूट आहे तरी रणतुंगा सारख्या रानडुकरासोबत कसकाय लग्न केलं याच आश्चर्य वाटत. क्यूट मुलींना अक्कल कमी असते हे तिला पाहून समजतं.

" सर कटे फिर भी जो तलवार ना छोडे वो होता है जाट"

हा डायलॉग ऐकून खूप हसू आलेलं. दुश्मन लोकांनी पुढच्या वेळी डोक उडवण्यापेक्षा फक्त हात उडवावेत मग कोणी जरी असला तरी तो तलवार नक्कीच सोडेल असा माझा अभ्यास सांगतो .


सतिश(भाऊ)साबळे .

अध्यक्ष/संपादक :- महाराष्ट्र सोशल मिडिया (महाराष्ट्र राज्य )


संबधित बातम्या