इंदापूर तालुक्याचा नवा आमदार, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून इंदापूरच्या या नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता.
इंदापूर तालुक्यातील जनतेचे वर्षानुवर्षे काही प्रश्न प्रलंबित असून यामध्ये मूलभूत सुविधा, आरोग्य, उद्योगधंदे आदी विषयी प्रश्न प्रलंबित आहेत तसेच मराठा समाजाचा आरक्षणाचाही सर्वात मोठा प्रश्न प्रलंबित आहे. पण आता हे सर्वच प्रश्न रमेश तात्या पाटील यांच्या माध्यातुन मार्गी लागतील असा विश्वास आहे :- सतीश भाऊ साबळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सोशल मीडिया, महाराष्ट्र राज्य.
इंदापूर : मराठा आरक्षणा साठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढून प्रस्थापित पुढाऱ्यांकडून मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अपेक्षा भंग झाल्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी राजकीय भूमिका घेत सकल मराठा समाजाच्या वतीने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने इंदापूर विधान सभा मतदार संघात रमेश तात्या पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
रमेश तात्या पाटील मराठा समाजातील एक उगवते नेतृत्व असून या पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इंदापूरच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावत. पण सध्याच्या सर्वच राजकीय पक्षांकडून सकल मराठा समाजाच्या आरक्षण व इतर प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे मराठा सकल समाजाच्या वतीने नवीन राजकीय भूमिका घेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे.
त्या अनुषंगाने रमेश तात्या पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदासंघातील उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने इंदापूर तालुक्यातील जनता आनंद व्यक्त करताना आता मराठा व इतर समाजाचे वर्षानुवर्षे आजी व माजी आमदारांकडून जानुणबुजून प्रलंबित ठेवलेले प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करीत आहे.
त्यामुळे यंदाची निवडणूक इंदापूरच्या जनतेने व महाराष्ट्र सोशल मीडियाने हातात घेण्याचे ठरविल्याने व त्यांना असलेली मनोज जरांगे पाटील यांची साथ इंदापूरच्या आजी व माजी आमदारांना जड जाणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरु असल्याचे दिसून येत आहे.