महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अंकिताताई हर्षवर्धन पाटील यांनी जाणुन घेतल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या.

 अंकिताताई हर्षवर्धन पाटील यांनी जाणुन घेतल्या  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या.
March 14, 2021 06:07 PM ago Pune, Maharashtra, India

प्रतिनिधी श्रद्धा तुपे

१४ मार्चला होणारी एमपीएससीची परिक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आढावा घेऊन सरकारने एमपीएससीची परिक्षा २१ मार्चला घेण्याचे ठरविले आहे. यावर पुण्यातील विद्यार्थ्यांनी अंकिताताई पाटील यांची भेट घेऊन परिक्षेच्या बाबतीत काही समस्या मांडल्या?

त्यावर ताई म्हटल्या परिस्थिती खूप गंभीर झाली आहे, अनेक विद्यार्थ्यांनी येण्या-जाण्यासाठी काही बुकिंग केलेल्या होत्या त्या त्यांना सध्याच्या परिस्थिती मुळे रद्द कराव्या लागल्या व जे काही विद्यार्थी परीक्षेसाठी आलेत त्यांना २१ मार्च पर्यंत वाट बघावी लागणार. या सगळ्याचा विद्यार्थ्यांना अर्थिक व मानसिक त्रास होतोय .

सध्या एक अध्यक्ष व एक सदस्यांवर एमपीएससीचा कारभार सुरू आहे आणि केवल दोन सदस्यांना मुलाखती घ्याव्या लागतात त्यामुळे वेळ जातोय आणि विलंब लागतोय. त्यामुळे रिक्त असलेल्या एमपीएससीच्या जागा लवकरात लवकर भराव्या हीच ताईंनी विनंती केली. आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना परीक्षेसाठी प्रेरणा व शुभेच्छा दिल्या.

संबधित बातम्या